प्रसाद कुलकर्णी व सौदामिनी कुलकर्णी यांचा जयकुमार कोले यांच्या हस्ते शाल,फेटा,पुष्पगुच्छ, ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता. १, समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी गेल्या साडेतीन दशकांहून अधिक काळ समाजवादी प्रबोधिनीच्या माध्यमातून जे लोकप्रबोधनाचे काम करत आहे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे. कालवश आचार्य शांताराम गरुड,डॉ.एन.डी. पाटील,शहीद गोविंद पानसरे यांच्या मुशीतून तयार झालेले प्रबोधन चळवळीतील अग्रणी अभ्यासू कार्यकर्ते, लेखक, संघटक,वक्ते,संपादक म्हणून प्रसाद कुलकर्णी महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनीं अतिशय नेटाने समाजवादी प्रबोधिनीचे वाढवत नेलेले कार्य व सर्व पुरोगामी चळवळींना दिलेली ऊर्जा महत्त्वाची आहे. भाई माधवराव बागल पुरस्कार या प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांच्या कार्याची यथोचित नोंद घेत त्यांचे महत्व अधोरेखित  केले आहे. आपणा सर्वांना त्याचा अभिमान आहे.त्यांच्या या कामात आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेणे ही काळाची गरज आहे. भारतीय राज्यघटना व तत्वज्ञानाची ते मांडत असलेली वैचारिक भूमिका आज अतिशय महत्वाची आहे ,असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते जयकुमार कोले यांनी व्यक्त केले.ते इचलकरंजीतील विविध राजकीय पक्ष आणि समता संघर्ष समिती यांच्या वतीने प्रसाद कुलकर्णी यांना 'भाई माधवराव बागल पुरस्कार' मिळाल्याबद्दल केलेल्या सपत्निक सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रसाद कुलकर्णी व सौदामिनी कुलकर्णी यांचा जयकुमार कोले यांच्या हस्ते शाल,फेटा,पुष्पगुच्छ, ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.स्वागत व प्रस्ताविक निमंत्रक सदा मलाबादे यांनी केले.

यावेळी मदन कारंडे ( राष्ट्रवादी काँग्रेस ),राहूल  खंजिरे( राष्ट्रीय कोंग्रेस पक्ष ),महादेव गौड ( शिवसेना ),अभिजित पटवा ( इचलकरंजी नागरिक मंच),धोंडिबा कुंभार ( लाल निशाण पक्ष ),प्रा.रमेश लवटे ( समाजवादी प्रबोधिनी ), शाहिर विजय जगताप ( शाहिरी व कला अकादमी ), बजरंग लोणारी ( समता संघर्ष समिती ),शिवाजी साळुंखे ( शेतकरी कामगार पक्ष ) प्राचार्य ए.बी.पाटील ( मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष )यांनी मनोगते व्यक्त केली. त्यातुन प्रसाद कुलकर्णी यांच्या जीवनदानी कार्याचा गौरव केला आणि महत्व स्पष्ट केले.तसेच त्यांची सैद्धांतिक पण सोपी मांडणी, सत्य व निर्भीड भाषा, अग्रभागी राहून करत असलेले मार्गदर्शन , सर्वाना घेऊन जाणारा स्वभाव आणि वागण्या- बोलण्यातील साधेपणा ,त्यांनी सातत्याने केलेले मार्गदर्शन,  वृत्तपत्र पत्रलेखक संघटनेला दिलेली दिशा,स्वतःसाठी काहीही न मागणारा निस्पृह विचारवंत कार्यकर्ता आदी विविध पैलूंचा उल्लेख या वक्त्यांनी केला.

प्रसाद कुलकर्णी  सत्काराला उत्तर देताना म्हणाले,हा सत्कार समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यात सहभागी असलेल्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांचा आहे मी निमित्तमात्र आहे. आजच्या राजकारण,अर्थकारण, समाजकारण, धर्मकारण,आणि संस्कृतिकारण या सर्व क्षेत्रात मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. ही आव्हाने संविधानासह सर्व उदात्त तत्त्वज्ञानांची मोडतोड करणारी आहेत. अशावेळी निधड्या छातीने  त्या विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे.लोक प्रबोधनाची गरज  आज कैक पटीने वाढलेली आहे. त्या कामामध्ये  सर्वांची सक्रीय साथ आवश्यक आहेच.मी माझ्या अखेरपर्यंत या  वैचारिक लढ्यात अग्रभागी असेन. इचलकरंजी शहरातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी आपुलकीने केलेला माझा सत्कार हा माझा घरचा सत्कार आहे. कोणत्याही कार्यकर्त्याला घरातून मिळालेल बळ अधिक प्रेरक व  उर्जादायी असते.या घरच्या सत्कारामुळे माझी उमेद अनेक पटींनी वाढलेली आहे मी सर्वांचा कृतज्ञ आहे. आपले सहकार्य व साथ अशीच अखंड राहावी ही अपेक्षा आहे.

यावेळी कॉ.हणमंत लोहार ( भारतीय कम्युनिस्ट पक्ष ), पद्माकर तेलसिंगे ( जनता दल सेक्युलर )प्रताप पाटील ( मनसे ), कॉ.सुनील बारवाडे ( सर्व श्रमिक संघ ),

हरी माळी ( नगरपालिका कामगार युनियन ) इस्माईल समडोळे ( स्वराज इंडिया ),संतोष सावंत ( मराठा महासंघ )अशोक कांबळे ( पीपल्स पार्टी ),रोहित दळवी ( राष्ट्र सेवा दल ), शिवाजीराव भोसले ( राष्ट्रीय कापड कामगार संघटना),नागेश क्यादगी (राष्ट्रीय विणकर सेवा संघ ),सुनील मेटे ( विणकर संघटना ), राजन मुठाणे ( महाराष्ट्र साहित्य परिषद ),पांडुरंग पिसे ( वृत्तपत्र पत्रलेखक संघ )यांच्यासह विकास चौगुले, राजू गांजवे,सयाजी चव्हाण, अन्वर पटेल,रामदास कोळी,किरण कटके,राजू कोंनुर,राजू नदाफ,कॉ.आनंदराव चव्हाण,प्रा.डॉ.राज पटेल, प्रा.डॉ.सौरभ पाटणकर,रोहित, रियाज जमादार, आदित्य धनवडे,शिवकुमार मुरतले, हेमंत वणकुद्रे,योगेश लंबे ,वाहिद शहापुरे, सिकंदर मुल्ला,मुकुंद शेंडगे,दत्तात्रय मांजरे, सतीश मगदूम आदी विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण यांनी आभार मानले.सूत्रसंचालन धोंडिबा कुंभार यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post