संभाव्य महापूराचा व अति वृष्टीचा सामना करणे साठी इचलकरंजी नगरपरिषदेची आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज


प्रेस मीडिया लाईव्ह :

हातकणंगले तालुका प्रतिनिधी श्रीकांत कांबळे :  

               कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरामध्ये आलेल्या मागील काही वर्षाच्या महापुराच्या व अतिवृष्टीच्या  पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार संभाव्य महापुराचा व अतिवृष्टीचा सामना करणे साठी इचलकरंजी नगरपरिषदेची आपत्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवणेच्या सुचना प्रशासक तथा  मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी दिले .

       या अनुषंगाने आज  इचलकरंजी नगर परिषदेच्या वतीने आपत्कालीन व्यवस्थापन कार्यक्रम २०२२ अंतर्गत पुर्वतयारीची आढावा बैठक तसेच अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे करणेत आले होते.   

       इचलकरंजी नगरपरिषद आपत्कालीन विभागा कडे यांत्रिक बोटी , साधी फायबर बोट, स्टिल कटर,वुडकटर ,लाईफ जॅकेट, रिफ्लेक्टीव्ह जॅकेट, लाईफ रिंग, दोर, मेगा फोन, गळ, ट्यूब, इमर्जन्सी लॅम्प, स्नेक हँगर,टॉर्च, स्लायडिंग शिडी , बायनाक्युलर  इत्यादी साहित्य तसेच फायर बुलेट, फायर फायटर, रुग्ण वाहिका,हायड्रोलिक प्लॅटफार्म,औषध फवारणी ट्रॅक्टर,सक्शन ट्रॅक्टर याचा  समावेश आहे. 

         यावेळी सर्व यंत्रसामग्री सुस्थितीत असले बाबतची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात,  मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल,अप्पर तहसीलदार शरद पाटील  यांनी घेवुन महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचेअचूक नियोजन करणेसाठी सुचना दिल्या.

       याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, बांधकाम माजी सभापती  उदयसिंह पाटील, उप मुख्याधिकारी केतन गुजर,कामगार अधिकारी विजय राजापुरे, नगरअभियंता संजय बागडे,भागवत सांगोलकर, नगर रचनाकार रणजित कोरे, पोलिस निरीक्षक राजु ताशिलदार,विद्युत अभियंता संदिप जाधव,  जल अभियंता अंकिता मोहिते, खरेदी पर्यवेक्षक प्रताप पवार, मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील, उपनगर अभियंता राजेंद्र गवळी, प्रविण बैले, राधिका हावळ, आरोग्य विभाग प्रमुख विश्वास हेगडे, मुख्य स्वच्छता निरिक्षक सुर्यकांत चव्हाण, विजय पाटील, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे यांचे सह शहरातील स्वयंसेवी / सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, जीवन मुक्ती सेवा संस्था इचलकरंजीचे सदस्य,तेजोनिधी रेस्क्यू फोर्सचे सदस्य, महापुराच्या काळात नगरपरिषदेस अत्यंत महत्त्वपुर्ण असे सहकार्य करणारे शहरातील पट्टीचे पोहणारे ,शहरातील प्राणी मित्र ,पत्रकार बंधु उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post