संपादकीय : शिक्षण संस्थांच्या स्वयंमूल्यांकनाचा भुलभुलैया.....

 संपादकीय :                              

 शिक्षण संस्थांच्या स्वयंमूल्यांकनाचा भुलभुलैया..... 

प्रेस मीडिया लाईव्ह :

डॉ. तुषार निकाळजे :

नुकतेच क्यू एस वर्ल्ड हायर एज्युकेशन संस्थेने जागतिक स्तरावरील शिक्षण संस्थांचे व विद्यापीठांची क्रमवारी(रँकिंग)  जाहीर केली. सध्या दहावी व बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. यावर्षीची महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावरील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तिसरीकडे शिक्षण व्यवस्था-  विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातबाजी देखील सुरू केली आहे. विद्यार्थी व पालक प्रवेश घेण्यासाठी चांगल्या शिक्षण संस्थांची निवड करतात, याबद्दल शंकाच नाही. परंतु खालील काही मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक आहे, असे वाटते. 

१) सध्या शिक्षण संस्था व विद्यापीठे यांनी आपण जगातील नामांकित विद्यापीठाच्या यादीमध्ये आहोत असे सांगण्यास सुरुवात केली आहे. हे सांगताना विद्यापीठ स्तरावरील प्रमुख असलेले कुलगुरू यांनी संबंधित विद्यापीठाच्या क्रमवारीबाबत जाहीर करणे आवश्यक आहे. विद्यापीठ क्षेत्रातील हा एक शिष्टाचार समजला जातो. जरी कुलगुरू प्रभारी असले तरीदेखील. परंतु गेल्या ७४ वर्षांमध्ये जतन केलेला हा शिष्टाचार काही विद्यापीठांच्या खुद्द प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच मोडला. या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुलगुरू, प्र-कुलगुरू, व्यवस्थापन परिषद यांना न जुमानता स्वतः विद्यापीठाच्या मूल्यांकनाबाबत टिंग्या मारण्यास सुरुवात केली. याला शिष्टाचार म्हणावा का? आपल्या घरातील उदाहरण म्हणून सध्या दहावी व बारावी परीक्षेच्या निकालानंतर उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आपल्या घरात प्रथमतः आजी-  आजोबा यांना पेढे देऊन आनंद साजरा करतात. जर आजी-आजोबा हयात नसतील तर घरातील त्यांच्या फोटो पुढे सद्भावनेने एखादा पेढा ठेवतात. ही झाली त्यांच्याबद्दलची कृतज्ञता. परंतु विद्यापीठ किंवा शिक्षण स्थरावरील एखाद्या अधिकाऱ्याने कुलगुरू किंवा प्र-कुलगुरू किंवा व्यवस्थापन परिषद यांना डावलून स्वतः जाहिरातबाजी करणे म्हणजे कृतज्ञता, शिष्टाचार यांना वेगळीच वाट दाखवल्याचे निदर्शनास येते. याचा बारकाईने अभ्यास केल्यास ज्या घरात कृतज्ञता, शिष्टाचार यांचा अभाव असेल ते इतरांना किती नीट वागवणार? कदाचित असे प्रशासकीय अधिकारी भविष्यातील कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्या नियुक्ती संदर्भातील रेस मधून मागे पडले, म्हणून हा प्रकार असावा. 

२)  दहावी व बारावीचा निकाल लागला असल्याने शैक्षणिक संस्था व विद्यापीठे यांना प्रत्यक्ष भेटी देऊन किंवा वेबसाईटवरून त्यांची माहिती, चित्रे पाहून त्या शैक्षणिक संस्थेची पत  ठरविली जाते. या वेबसाईटवर NAAC(A+), (A++), (B ++) ,वर्ल्ड रांकिंग असे शब्द वापरून शैक्षणिक संस्थेची जाहिरातबाजी केली जाते आणि मग विद्यार्थी व पालक त्या संस्थेकडे आकर्षित होतात.परंतु पालक व विद्यार्थी यांनी कोणतीही शैक्षणिक संस्था निवड करताना काही बाबींचा सखोल अभ्यास करणे आवश्यक वाटते.कारण त्यांचे भविष्य यावर अवलंबून असते.एखादा गरीब शेतकरी स्वतःची जमीन गहाण ठेवून मुलाला किंवा मुलीला शिक्षणासाठी खर्च करीत असतो. तर काही आई वडील स्वतःचे घर गहाण ठेवून किंवा विकून  मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च करीत असल्याची उदाहरणे आहेत. विद्यार्थी व पालक उच्चस्तरीय शिक्षण घेताना टक्केवारीच्या / मेरीटच्या/ आकड्यांचा हिशोब करीत असतात. विद्यार्थ्यांचे प्रवेश पॉईंट १०, पॉईंट २० , पॉईंट  २६  टक्क्यांनी बाद होतात. परंतु ज्या शिक्षणसंस्था या विद्यार्थ्यांचे प्रवेश बाद  करतात, त्यांनी स्वतःच्या टक्केवारीचे किंवा  मेरीटचे किंवा क्रमवारीचे अवलोकन करावे. विद्यार्थी व पालकांनी पुढील दोन तीन गोष्टींचा योग्य अभ्यास केल्यास शिक्षणव्यवस्थेचे प्रत्यक्ष स्वरूप त्यांच्यापुढे येईल. एखाद्या शिक्षण व्यवस्थेचा किंवा विद्यापीठाचा शैक्षणिक क्षेत्रातील पत /गुणवत्ता  पहावयाची  असेल तर   QS world रँकिंग, टाईम हायर एज्युकेशन रँकिंग/ मूल्यांकन इत्यादींच्या वेबसाईटवर जाऊन त्या शैक्षणिक संस्थेचे किंवा विद्यापीठाचे नाव टाईप करून शोध घेतल्यास त्यांना माहिती मिळू शकेल.विद्यार्थी व शिक्षक यांचा दर किती आहे? यावर लक्ष केंद्रित करावे, म्हणजे विद्यार्थी भरमसाठ आणि शिक्षक कमी ही सांगड विद्यार्थ्यांना पोषक शिक्षण देऊ शकेल का? त्याकरिता विद्यार्थी व शिक्षक यांच्या आकडेवारीचा समतोल असणे योग्य आहे.उदाहरणार्थ साठ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक. परंतु सध्या दीडशे विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे त्या बिचाऱ्या शिक्षकाला किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल किंवा बिचारे विद्यार्थी तरी किती अवलोकन करतील? हा एक वेगळाच प्रश्न आहे. शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठाची विषयनिहाय गुणवत्ता(सब्जेक्ट वाईज परफॉर्मन्स) देखील  तपासणी आवश्यक आहे. 

म्हणजे शिक्षण व्यवस्थांमध्ये शिकविला जाणाऱ्या शाखा किंवा विषय यांची गुणवत्ता किती आहे? हे वर्ल्ड रँकिंगमध्ये नमूद केलेले असते. 

   जागतिक स्तरावरील काही विद्यापीठांच्या किंवा शैक्षणिक संस्थांच्या विषय निहाय गुणवत्तेची माहिती पुढीलप्रमाणे;-               


      

 जागतिक वर्ल्ड रँकिंग स्तरावरील मानांकनाची सध्याची पहिल्या १०  विद्यापीठांची यादी पुढीलप्रमाणे:-

                 

    आपल्या देशातील पहिल्या दहा नामांकित विद्यापीठांची यादी पुढील प्रमाणे:- 

                  


           आपल्या  वर्ल्ड रँकिंग राज्यातील विद्यापीठांचा गेल्या  दहा वर्षातील ओव्हरऑल परफॉर्मन्स पुढील प्रमाणे:- 

                   

                 या सर्वच बाबींचा एकत्रित विचार केल्यास आपल्या राज्यातील शिक्षण व्यवस्था किंवा विद्यापीठे नेमकी कुठे आहेत? याचे अवलोकन होईल. प्राथमिक सोयी-  सुविधांच्या नावाखाली फक्त इमारती, सुरक्षा भिंती, सुरक्षा कवच, मैदाने बांधून किंवा इतर समारोह साजरे करून पैसा, वेळ , उधळण यापेक्षा शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारण्याकडे वाटचाल व्हावी, म्हणजे आपल्या शैक्षणिक संस्थांचा किंवा विद्यापीठांचे मानांकन भविष्यात निश्चितच जागतिक क्रमांकाच्या पहिल्या पन्नास क्रमवारीत  तरी जाईल, असे वाटते. येथे एक विशेष उल्लेख करावासा वाटतो. इतर विद्यापीठांना वाटप होणारा क्रीडा निधी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठांच्या प्रगतीसाठी वापरण्यात यावा असे वाटते. कारण इतर विद्यापीठांसारखे वेगवेगळे अभ्यासक्रम क्रिडा विद्यापीठांकडे नाही. आंतरराष्ट्रीय क्रिडा विद्यापीठाची केलेली घोषणा अद्याप कोणत्या राजकारणामुळे मागे पडली? इतर विद्यापीठांना संबंधित निधी वाटप करताना ही घोषणा कशी लक्षात राहीली नाही?इतर विद्यापीठांना वाटप होणारा क्रीडा निधी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठांच्या प्रगतीसाठी वापरण्यात यावा असे वाटते. कारण इतर विद्यापीठांसारखे वेगवेगळे अभ्यासक्रम क्रिडा विद्यापीठांकडे नाही.

शिक्षण संस्था किंवा विद्यापीठांनी करीत असलेल्या स्वयं मूल्यांकनाची तुलना वर्ल्ड रँकिंगच्या माहितीशी करून भविष्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा असे वाटते.









Post a Comment

Previous Post Next Post