क्राईम न्यूज : गुन्ह्यात मदत करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना पोलीस अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात


प्रेस मीडिया लाईव्ह

सुनील पाटील :

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना पोलीस हवालदाराला अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.अण्णासाहेब बाबुराव चव्हाण (वय-52 रा. लक्ष्मीनगर, मांडवगण रोड, श्रीगोंदा) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई मंगळवारी (दि.7) राशिन येथे केली. 

अण्णासाहेब चव्हाण हे कर्जत पोलीस ठाण्यात   पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांची नेमणूक राशीन दुरक्षेत्र येथे आहे. भोंबोरा येथील 37 वर्षीय तक्रारदाराने याबाबत अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी (दि.6) तक्रार केली होती. तक्रारदार यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा  दाखल असून या गुन्ह्यात मदत करण्यासाठी चव्हाण यांनी 30 हजार रुपये लाच मागितली. तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी अहमदनगर एसीबीकडे तक्रार केली.

पथकाने पडताळणी केली असता चव्हाण याने 30 हजार रुपये लाच मागून तडजोडीअंती 20 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार आज (मंगळवार) राशिन येथे सापळा रचण्यात आला. अण्णासाहेब चव्हाण यांना तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक काद्यांतर्गत गुन्हा  दाखल केला आहे

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे पोलीस अंमलदार संतोष शिंदे, रमेश चौधरी, विजय गंगुल, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड,महिला पोलीस नाईक राधा खेमनर, संध्या मस्के, चालक पोलीस हवालदार हरुन शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post