विभागीय माहिती कार्यालयाचे वाहनचालक रविंद्र तिडके यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोपप्रेस मीडिया लाईव्ह :

 अमरावती येथील विभागीय माहिती कार्यालयातील वाहन चालक रविंद्र तिडके  यांना सेवानिवृत्ती निमित्त भावपूर्ण निरोप देण्यात आला. सेवानिवृत्ती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रभारी उपसंचालक (माहिती) हर्षवर्धन पवार अध्यक्षस्थानी होते. सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त श्री तिडके यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला

      कार्यक्रमाला सहाय्यक संचालक अपर्णा यावलकर, माहिती सहाय्यक पल्लवी धारव, लेखापाल विजया लोळगे, प्रदर्शन सहाय्यक विश्वनाथ धुमाळ, मनोज थोरात, सुनील काळे, लिपिक दिनेश धकाते, योगेश गावंडे, रुपेश सवाई, वैशाली ठाकरे, कोमल भगत, गजानन परटके, कॅमेरामन नितीन खंडारकर, चंद्रकांत पाटील, छायाचित्रकार मनीष झिमटे, सागर राणे, वाहनचालक विजय आठवले, गणेश वानखेडे, हर्षल हाडे, संदेश वाहक दिपाली ढोमणे, गजानन पवार, राजश्री चोरपगार, प्रतिक वानखेडे आदी उपस्थित होते

      श्री तिडके यांच्या निरोप समारंभानिमित्त कार्यालयातील सहकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या, तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. श्री तिडके यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. पल्लवी धारव यांनी सूत्रसंचालन केले. विश्वनाथ धुमाळ यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post