जल्लोष, मामाच्या गावाचा ..!

 सलग बावीस वर्षे सेवा मित्र मंडळा तर्फे  मामाच्या गावाची सफर  हा उपक्रम राबवला जात आहे .

प्रेस मीडिया लाईव्ह :

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे :   बालकांसाठी उन्हाळी सुट्टी म्हणजे दंगामस्ती, खेळ खाऊ आंणि रानवा-याची भटकंती ! मात्र अनाथ आणि अपंगांच्या संस्थांमधील मुले म्हणजे कोंडलेली फुलपाखरे, ते सर्व जण या आनंदा पासून वंचित असतात, ही बाब लक्षात घेऊन सलग बावीस वर्षे झाली सेवा मित्र मंडळा तर्फे  मामाच्या गावाची सफर  हा उपक्रम     राबवला जात आहे .


या वर्षी  ४ मे रोजी, दुपारी चार वाजता, सात  संस्थांची दिडशेहून अधिक मुले, मंडळात मुक्कामी येत असून, ६ मे रोजी दुपारी चार वाजता सांगता समारंभ होणार आहे. हे तीन दिवस, मंडळाचे सर्व कार्यकर्ते, मामाच्या भूमिकेत असणार आहेत . मुलांसाठी खाऊ, खेळ, भटकंती, धमाल करमणूक असे सर्व काही  सेवा मित्र मंडळ यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहभागाने संपन्न होणार आहे. याच  उत्सव मंडपात, ७ मे रोजी  दरवर्षी प्रमाणे ,  सेवा मित्र मंडळ   लुई ब्रेल अंध अपंग संस्था यांच्या वतीने व पुणे करांच्या सहकार्याने चि. सौ . का  प्रीती ,  (श्रीमती मनकर्निका व कै . दिलीप मल्हारी गाडे यांची कन्या रा. खेड , जिल्हा पुणे ) व चिरंजीव दत्तात्रय (सौ .लीलाबाई व श्री प्रभाकर सूरयभान जाधव यांचे चिरंजीव रा. तालुका संगमनेर , जिल्हा अहमदनगर)आणि चि. सौ. का राधा (सौ. दुर्गम्मा व श्री गुरुप्पा चनप्पा बडीगेर  यांची कन्या रा. याद गीर , जिल्हा कर्नाटक ) व चि. रामलिंग (सौ. मरीअम्मा व श्री. शिवाप्पा  शिवाप्पा चलवादी  यांचे चिरंजीव रा. संगमनेर , जिल्हा अहमदनगर) .भगिनीचे विवाह सोहळा सांय ५.०७ वाजता संपन्न होणार आहेत तरी या विवाह सोहळ्यास समस्त पुणेकरांनी उपस्थित राहून या  कार्यास खऱ्या अर्थाने शोभा आणावी व नव दांपत्यास शुभाशीर्वाद द्यावेत . तसेच  सांय. ७ ते १० या वेळेत महाप्रसाद आहे.   सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष मा.श्री  शिरीष भाऊ मोहिते  व सर्व कार्यकर्ते यांनी समस्त पुणेकरांना विनंती केली आहे .कार्येक्रमाचे स्थळ सेवा मित्र मंडळ चौक  २५८ शुक्रवार पेठ पुणे  .

Post a Comment

Previous Post Next Post