गळके व निकृष्ट पाणी टँकर गाड्यांवर कारवाई करावी: आपची मागणी

 लोकांना चिरडणाऱ्या बेदरकार टँकर चालक, दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा..

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : गेल्या १० दिवसात पुणे शहरात टँकर खाली चिरडून दोन वेगवेगळ्या अपघातात  दोन नागरिकांचा बळी गेला आहे.गळके व निकृष्ट पाणी टँकर गाड्यांवर कारवाई करावी तसेच लोकांना चिरडणाऱ्या बेदरकार टँकर चालक, दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा मागण्या करणारे निवेदन आज आम आदमी पक्षातर्फे पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना आज दिले आहे. टँकरमधून रस्त्यावर होणारी पाणी गळती  व पाणी टँकर फिटनेस प्रमाणपत्र नसणे ह्या विषयांवर अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. फिटनेस प्रमाणपत्र देण्या अगोदर ह्या वाहनांना वैध मापन विभागाकडून पाणी वाहण्यासाठी क्षमता प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, ह्या बाबींचा उल्लेख निवेदनात केला आहे. *आप महाराष्ट्र वाहतूक विंग अध्यक्ष श्रीकांत आचार्य, आप पुणे शहर संघटक एकनाथ ढोले, आम आदमी पक्षाचे आनंद अंकुश* यांनी हे निवेदन दिले. 

तसेच RTO अधिकाऱ्यांसोबत सोबत टँकर फिटनेस प्रमाणपत्र  सोबत इतर महत्त्वाच्या तांत्रिक बाबी (technical issues) संदर्भात चर्चा झाली.सध्या पुणे शहरामध्ये पाणीटंचाई खूप मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यामुळे पाण्याच्या टँकरची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परंतु, अनेक पाण्याचे टँकर हे गळके असल्याचे आम आदमी पक्षाच्या निदर्शनास आले असून त्यातून खूप मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. 

 पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे टँकर कधीही गळके नसतात. दुधाचे टँकर गळते नसतात...  तर मग पाण्याचे गळके टँकर एवढ्या मोठ्या संख्येने पुणे शहरांमध्ये राजरोसपणे कसे वावरत आहेत ? याबाबत वाहतूक प्रशासन काहीच कारवाई का करत नाही? अमूल्य ठेवा असलेल्या पाण्याची अशा पद्धतीने नासाडी करणे योग्य नाही. तरी या बाबत वाहतूक प्रशासनाने तातडीने निकृष्ट गळत्या टँकरवर कारवाई करावी.

आणखी भरीत भर म्हणुन की काय टँकरमुळे घडणाऱ्या अपघातांच्या प्रकरणात ही वाढ झाली आहे. या *टँकर माफियांची दहशत इतकी आहे की त्यांच्या passing नसलेल्या निकृष्ट दर्जाच्या वाहनाना RTO व पोलीस प्रशासन कुणीही अटकाव करीत नाही. हे टँकर्स बिनबोभाटपणे रस्त्यावरून धावतात. त्यांत अनेकांना जीव गमवावा लागला आहे*. गेल्या दहा दिवसात टँकरखाली दोन लोक चिरडले गेले आहेत. तरीही प्रशासन आपल्या कुंभकर्णी झोपेतून जागे व्हायला  तयार नाही. या *सबंधित टँकर चालकावर व कर्तव्य कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा*, अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे.

पाणी हे द्रव्य अति चंचल असते. टँकरच्या हालचाली प्रमाणे आतील पाण्याचा वेग ठरतो. हा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी पाणी टँकरच्याचा आत द्रव्य गतिरोधक असणे अत्यंत गरजेचे आहे.  हे द्रव्य गतीरोधक नसल्यास , प्रवासा दरम्यान अचानक गती कमी करणे  टँकर चालकाला शक्य होत नाही. वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. ब्रेक क्षमता ही द्रव्य गतिरोधक गृहीत धरून डिझाईन केली असते.कालांतराने हे द्रव्य गतिरोधक  निघू शकते. ह्या स्तिथीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अधिक तत्परतेने नुसती पाणी गळती थांबवून प्रमाणपत्र देणे अशास्त्रीय ठरेल. *टँकरच्या टाकीच्या आत द्रव्य गतिरोधक सुस्थितीत आहेत की नाही ह्याची तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र  द्यावे ही आम आदमी पार्टीने विनंती केली आहे.*Post a Comment

Previous Post Next Post