ससून रुग्णालयाचे डॉक्टर .एन. पी. झंझाड मयताचा अंतिम अहवाल देण्यासाठी चक्क पोलिसांकडेच लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला .

पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने या प्रकाराला वाचा फोडली


प्रेस मीडिया लाईव्ह :

जीलानी उर्फ मुन्ना शेख :

 पुणे :  ससून रुग्णालयाच्या डॉक्टरने मयताचा अंतिम अहवाल देण्यासाठी चक्क पोलिसांकडेच लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .  डॉ. एन. पी. झंझाड असे लाच मागणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने या प्रकाराला वाचा फोडली आहे.

रस्त्यावर अचानक मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण पोलिसांना समजने शक्य नसते. अशावेळी शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरतो. हाच अहवाल देण्यासाठी ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ झंझाड पैशासाठी पोलिसांची अडवणूक करत असल्याचे उघड झाले आहे.

मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. डॉ झंझाड यांनी मृत्यूचे कारण 'इंटर्नल हेड इंजूरी' असल्याचे तुम्ही सांगितले. हे कारण दिल्यास विलंब आणि खुनाचा गुन्हा दाखल करावा लागेल, म्हणून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने मयत व्यक्तीला दारू आणि ताडी पिण्याचे व्यसन असल्याचे घटनाक्रमाची माहिती सांगितली. त्यानंतर डॉ झंझाड यांनी मयत व्यक्तीचा मृत्यूचा अंतिम अहवाल देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर 5 हजार रुपये दिल्यानंतर अंतिम अहवाल दिला.

डॉ झंझाड हे नेहमीच पोस्टमार्टम अहवाल आणि मयत व्यक्तीच्या मृत्यूचा अंतिम अहवाल देण्यासाठी इंटरनल किंवा एक्स्टर्नल जखमांचे कारण सांगून पैशाची मागणी करतात आणि पोलिसांची विनाकारण अडवणूक करतात. पोस्टमार्टम अहवालसाठी प्रत्येकी शंभर रुपये द्यावे लागतात. पैसे न दिल्यास अहवाल तयार नसल्याचे कारण सांगून किंवा किरकोळ त्रुटीवर परत पाठवून त्रास दिला जातो. त्यामुळे गुन्हे व अकस्मात मृत्यूची प्रकरणे प्रलंबित राहत आहेत, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

या सगळ्या प्रकणासंदर्भात पोलिसांनी पत्र काढले आहे. पोलिसांकडूनच लाच घेत आहेत. हा प्रकार योग्य नाही. त्यामुळे पोलिसांची अडवणूक करणाऱ्या डॉ. झंझाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुणे पोलिसांनी पाठवलेल्या एका पत्रात करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post