जमाते इस्लामी हिंद ,पुणे कडून ईद मिलन आणि परिसंवादाचे आयोजन

'धर्म, अधर्म आणि धार्मिकता ' विषयावर २१ मे रोजी परिसंवाद 

प्रेस मीडिया लाईव्ह 

पुणे :जमाते इस्लामी हिंद ,पुणे या संघटनेकडून शनिवारी ईद मिलन कार्यक्रम आणि 'धर्म, अधर्म आणि धार्मिकता ' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार, दिनांक २१ मे २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम गांधी भवन, कोथरूड येथे होणार आहे. 

युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष  डॉ. कुमार सप्तर्षी, ख्रिश्चन धर्मगुरू रेव्हरंड चित्रलेखा जेम्स आणि जमाते इस्लामी हिंदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तौफीक अस्लम खान हे या परिसंवादात सहभागी होणार आहेत. परिसंवाद झाल्यानंतर शिरखुर्म्याचा आस्वाद घेवून कार्यक्रमाचा समारोप होईल. सर्व शांतीप्रेमी आणि अमनपसंद नागरीकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post