रूपाली पाटील ठोंबरें सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जीलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : इंधन दरवाढ व महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीनं स्मृती इराणींविरोधात आंदोलन छेडल्यानंतर भाजप व राष्ट्रवादीचे  कार्यकर्ते एकमेका समोरआले. राष्ट्रवादी काँग्रेसनं स्मृती इराणीं विरोधात घोषणाबाजी करत हॉटेलमध्ये घुसण्याचा जोरदार प्रयत्न केला. या आंदोलनात सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरेंसह 30-40 राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी दणका दिला आहे.

या बाबत रूपाली पाटील ठोंबरें सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  स्मृती इराणी यांचा पुणे दौरा चांगलाच वादग्रस्त ठरला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post