केतकी चितळेंच्या प्रसिद्धीसाठी विकलांग झालेल्या मनोवृत्तीचा निषेध : विपुल म्हैसुरकर

 कार्याध्यक्ष,पर्वती विधानसभा मतदारसंघ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  कुणाच्याही व्यंगावर घाणेरडी टिका करणे हे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे.त्यातही ज्या नेत्याने आपले सर्व  आयुष्य महाराष्ट्राच्या,देशाच्या  हितासाठी खर्चिले आहे अशा जेष्ठ शरद पवार यांच्यावर विकृत  टीका करणे हे सवंग  प्रसिद्धीसाठी केलेला एक मूर्ख प्रयत्न आहे. मूर्ख केतकी चितळे म्हणजे संपूर्ण ब्राम्हण समाज नव्हे,किंवा तिची मते म्हणजे ब्राम्हण समाजाची मते नव्हेत.पण केतकी आणि तिची पाठराखण करणाऱ्या लोकांना हे कळले पाहिजे की अशा वर्तनामुळे संपूर्ण ब्राह्मण समाज बदनाम होतो.अशा विकलांग मनोवृत्तीचा जाहीर निषेध करीत आहोत ,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष विपुल म्हैसुरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे .

'शरद पवार यांना सातत्याने लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते आणि सामान्य जनता तो यशस्वी होऊ देणार नाही.अशा प्रत्येक प्रयत्नाला चोख उत्तर दिले जाईल,केतकी चितळे यांचे डोके ठिकाणावर आहे का,त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे का,हे तपासण्याची गरज आहे,असेही त्यांनी म्हटले आहे 


Post a Comment

Previous Post Next Post