मातंग समाजाचा युवक मनोज आव्हाड यांच्या हत्ये प्रकरणी ऍट्रोसीटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करावा

दिवंगत मनोज आव्हाड यांच्या कुटुंबियांची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई दि.23 -मातंग समाजाचा युवक मनोज आव्हाड यांची नुकतीच औरंगाबाद येथील टीव्ही सेंटर भागात अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आली होती.त्या अमानुष गुन्ह्याचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला असून दिवंगत मनोज आव्हाड यांच्या शोकाकुल कुटुंबियांची त्यांच्या निवासस्थानी  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी दिवंगत मनोज आव्हाड यांच्या कुटुंबियांना रिपब्लिकन पक्षातर्फे 1 लाख रुपये सांत्वनपर निधी देण्यात येणार असल्याचे सांगत दिवंगत मनोज आव्हाड यांच्या  पत्नीला शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी यावेळी दिले. 

 मनोज आव्हाड यांच्या हत्ये प्रकरणी ऍट्रोसीटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची सूचना ना.रामदास आठवले यांनी पोलीस प्रशासनाला केली.ऍट्रोसीटी ऍक्ट नुसार मयत मनोज आव्हाड कुटुंबाला सांत्वनपर मदत शासनाने द्यावी याबाबत प्रशासनाने कारवाई करण्याचे आणि रिपब्लिकन पक्ष याबाबत पाठवपूरावा करून दिवंगत मनोज आव्हाड कुटुंबाला न्याय मिळवून देईल असे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले. 


                

Post a Comment

Previous Post Next Post