महागाईने मध्यमवर्गीयांचे मासिक बजेट कोलमडले

 महागाईमुळे त्रस्त झालेली जनता हेच का ते अच्छे दिन असा संतप्त सवाल करत आहे. 

प्रेस मीडिया लाईव्ह :

देशात महागाई दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या दहा वर्षात जेवण दुपटीने महागले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतरच्या ८ वर्षांच्या काळात महागाईचा आलेख चढतच चालला असून सर्वसामान्यांना घरखर्च चालवणे कठीण होऊन बसले आहे. महागाईमुळे त्रस्त झालेली जनता हेच का ते अच्छे दिन असा संतप्त सवाल करत आहे. 

किरकोळ महागाईने गेल्या आठ वर्षांतील विक्रम मोडत एप्रिलमध्ये उच्चांकी ७.७९ टक्के दर गाठला आहे. सरकारी आकडेवाडीनुसार मार्च २०२१ च्या तुलनेत मार्च २०२२ मध्ये अन्नधान्याच्या किमतीत ७.६८ टक्क्यांनी वाढ झाली. नोव्हेंबर २०२० नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. तर जानेवारी २०१४ ते मार्च २०२२ दरम्यान मध्यमवर्गीयांच्या मासिक बजेटमध्ये ४.४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. होलसेल ॲण्ड रिटेल प्राइज इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या अहवालानुसार मार्च २०१२ च्या तुलनेत मार्च २०२२ मध्ये किराणा सामानाच्या किमतीत ६८ टक्के वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ८५० रुपयांत किराणा सामान भरले जायचे. त्याच किराणा सामानासाठी आता १६०० रुपये मोजावे लागत असल्याचे विविध रिपोर्टस् सांगतात. 


महागाईचा हा भस्मासूर अधिकाधिक भयानक रुप धारण करत आहे. असे असताना या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत हनुमान चालीसा, भोंगे अशा विषयांना प्राधान्य देत मूळ समस्येला बगल देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महागाईच्या झळांनी सर्वसामान्य होरपळत असताना केंद्र सरकार मात्र याबाबत एक चकार शब्द काढत नाही, मोदीजी हेच का तुमचे अच्छे दिन..?

Post a Comment

Previous Post Next Post