सर्व राजकीय पक्षांनी छत्रपती संभाजी राजे यांना राज्यसभेत बिनविरोध पाठवावे - रविकांत दानमप्रेस मीडिया लाईव्ह :

जालना : प्रतिनिधी

आगामी राज्यसभेच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी छत्रपती संभाजी राजे यांना राज्यसभेत बिनविरोध पाठवावे असे आवाहन ख्रिस्ती समाज समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रविकांत दानम यांनी छत्रपती संभाजी राजे यांची भेट घेऊन स्वराज संघटनेस पाठिंबा देतांना केले आहे.

ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने पुणे येथे  दि.15 मे 2022 रोजी छत्रपती संभाजी राजे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी त्यांच्या स्वराज्य संघटनेस पाठिंबा देण्यात आला. यावेळी ख्रिस्ती समाज समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रविकांत दानम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आगामी राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सहा जागांवर 2 भाजप,1 शिवसेना, 1 राष्ट्रवादी काँग्रेस, 1 काँग्रेस, 1 अपक्ष असे पक्षीय बलाबल असणार आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. त्यांचे कार्य पाहता त्यांनी सर्व जातीपातीच्या  आणि धर्मातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची राज्यसभेवर निवड झाल्यास तळागाळातील लोकांच्या आशा पल्लवीत होतील आणि त्यांना कुठले हि राजकारण न करणारा एक हक्काचा व्यक्ती मिळेल. येणाऱ्या 

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना,  राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, अपक्ष यांनी बिनविरोध निवडुन द्यावे असे आवाहन अध्यक्ष रविकांत दानम यांनी केले आहे. यासाठी सर्व पक्षाच्या अध्यक्षांची आणि प्रमुखांची भेट घेऊन त्यांना देखील ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने पत्र देऊन विनंती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष रविकांत दानम, उपाध्यक्ष पा. नितीन काळे, कोषाध्यक्ष सुनिल उबाळे, विधी सल्लागार एड. विवेक दौंडे, प.म. विभाग प्रमुख मंगेश बोधक, प.म. महिला अध्यक्ष सौ.हेमा मदनकर, निधी संकलन सदस्य जॉर्ज मदनकर, राजेश नायर, सौ. सगाई नायर यांची उपस्थिती होती

Post a Comment

Previous Post Next Post