क्राईम न्यूज : तारदाळच्या युवकाचा मिञांकडून देवरुख घाटात खून

 संशयित तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात...


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी शहरा लगतच्या तारदाळ मधील महादेव उर्फ दादासो किसन निगडे या युवकास मित्रांनी फिरायला नेऊन देवरूखच्या घाटात त्याचा खून केल्याची घटना देवरुख पोलिसांच्या निदर्शनास आली. याप्रकरणी संशयीत आरोपी सुरज मेहबूब चिकोडे , गणेश राजेंद्र शिवारे ,प्रतीक बापूसो कोळी या तिघांना देवरुख पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..

तारदाळ येथील सुरज चिकोडे याची चौकात पानपट्टी असून तो अनेक अवैध व्यवसाय करीत असल्याची चर्चा आहे. तसेच सुरज हा दोन वर्षापूर्वी रावण गंगचा म्होरक्या होता. त्यावेळीही गावातील लोकप्रतीनिधी व एजंटांनी सुरजला पाठीशी घातल्याने गावामध्ये सुरज याच्या रावण गॅंगची मोठी दहशत असून त्याआधारे तो अनेक गुन्हेगारी कारवाया  करत असल्याची गावात जोरदार चर्चा आहे. याच गावातील महादेव उर्फ दादासो किसन निगडे या युवकास सुरज चिकोडे व त्याच्या मिञांनी फिरायला नेऊन देवरूखच्या घाटात त्याचा खून केल्याची घटना देवरुख पोलिसांच्या निदर्शनास आली. याप्रकरणी संशयीत आरोपी सुरज मेहबूब चिकोडे , गणेश राजेंद्र शिवारे ,प्रतीक बापूसो कोळी या तिघांना देवरुख पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या घटनेनंतर मयत दादासो निगडे याला त्याचे राहते घर व दुकान गाळ्यासाठी जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची चर्चा घटनास्थळी होती. घटनेची माहिती कळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात येताच संशयीत आरोपी सुरज चिकोडे याच्या घरावर नातेवाईक व ग्रामस्थांनी हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लाठीमार करत जमाव पांगविला. परंतु बराच काळ शिवाजी चौकात तणाव निर्माण झाला होता. 

या घटनेतील मयत दादासो निगडे हा १६ एप्रिल रोजी देव दर्शनासाठी घरातून निघून गेला होता. तो परत न आल्याने त्याच्या आईने शहापूर पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. दरम्यान , आठ दिवसांपूर्वी मयताची पत्नी सौ. रेश्मा निगडे ही घरातून न सांगता पळून गेल्याची फिर्याद शहापूर पोलिस ठाण्यात नोंद आहे. दरम्यान रविवारी ८ मे रोजी रात्री देवरुख पोलिसांनी आरोपी सुरज मेहबूब चिकोडे , गणेश राजेंद्र शिवारे ,प्रतीक बापूसो कोळी या तिघांना ताब्यात घेतल्याने तारदाळ गावामध्ये काही काळातच दादासो निगडे या युवकाचा खून झाल्याची वार्ता पसरली. नातेवाईकांनी देवरुख पोलिसांशी संपर्क साधला असता मदत दादासो निगडे याच्या कपड्यावरुन मयताची ओळख पटली. त्यामुळे नातेवाईकांनी आक्रोश केला. मयताचा मोबाईल लोकेशन, कॉल रेकाॅर्ड तपासून देवरूख पोलिसांनी तपास अधिक गतीमान करत खुनाचा उलगडा केला. मयताचे नातेवाईक हे देवरुखहून घराकडे येताच गावामध्ये नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेमुळे शिवाजी चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post