सौ.रेश्मा नदाफ आदर्श समाजसेविका पुरस्काराने सन्मानित

 युवा पञकार संघाच्या पुरस्काराचे मंञी जयंत पाटील यांच्या हस्ते वितरण..


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ.रेश्मा बाबासो नदाफ यांना युवा पञकार संघाच्या वतीने आदर्श समाजसेविका पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.कोल्हापूर येथे नुकताच झालेल्या एका शानदार समारंभात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष ,माजी खासदार धनंजय महाडिक , जिल्हाधिकारी राहुल रेखावार , आमदार श्रीमती जयश्री पाटील व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

युवा पञकार संघाच्या वतीने पञकारांना संघटीत करतानाच पञकारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो.याशिवाय सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात.याचाच एक भाग म्हणून दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते.यंदाच्या वर्षी देखील युवा पञकार संघाच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध संस्था व व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.यामध्ये इचलकरंजी येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ.रेश्मा बाबासो नदाफ यांना युवा पञकार संघाच्या वतीने आदर्श समाजसेविका पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.कोल्हापूर येथे नुकताच झालेल्या एका शानदार समारंभात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष ,माजी खासदार धनंजय महाडिक , जिल्हाधिकारी राहुल रेखावार , आमदार श्रीमती जयश्री पाटील व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.या पुरस्काराच्या रुपाने आणखी चांगले कार्य करण्यास मला प्रेरणा मिळाली असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सौ.रेश्मा नदाफ यांनी सांगितले.तसेच भविष्यात महिलांना संघटीत करुन त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी निश्चित प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास माजी आमदार राजेश क्षीरसागर , माजी महापौर निलोफर आरेकर , पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे ,निवृत्त पोलीस अधिकारी आर.आर.पाटील ,कायदे सल्लागार ॲडव्होकेट संदिप पवार यांच्यासह पदाधिकारी ,मान्यवर व नागरिक उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post