कोरोची येथे हटकर कोष्टी समाज नामफलकाचे अनावरण

 मान्यवरांच्या उपस्थितीत पदयात्रा ;समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरालगतच्या कोरोची येथे हटकर कोष्टी समाजाच्या नामफलकाचा अनावरण समाजाचे राज्याध्यक्ष डॉ. नंदकुमार वसवाडे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी काढण्यात आलेल्या पदयाञेला ग्रामीण व शहरी भागातील समाज बांधव उपस्थित राहून उत्स्फूर्त दिला.

इचलकरंजी शहर व परिसरात हटकर कोष्टी समाजाची संख्या लक्षणीय असून संघटितरित्या धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात सातत्य राखले जाते.याच अनुषंगाने इचलकरंजी शहरालगतच्या कोरोची येथे हटकर कोष्टी समाजाच्या नामफलकाचा अनावरण समाजाचे राज्याध्यक्ष डॉ. नंदकुमार वसवाडे यांच्या हस्ते व इचलकरंजी हटकर कोष्टी समाजाचे अध्यक्ष शिवकांत मेत्री यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलेयावेळी उद्योगपती डी. एम. कस्तुरे, चौंडेश्वरी सूतगिरणीचे चेअरमन सुनिल सांगले, सरपंच रेखा अभिनंदन पाटील, उपसरपंच सुतार, युवक अध्यक्ष अमित खानाज यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी हटकर कोष्टी समाजाचे राज्याध्यक्ष डॉ. नंदकुमार वसवाडे यांनी समाजाच्या उन्नतीसाठी समाज बांधवांनी एकत्र आले पाहिजे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजाचे संघटन मजबूत केल्यास समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल ,असा विश्वास बोलून दाखवला.तत्पूर्वी , कोरोची येथील पाण्याच्या टाकीपासून चिंतामणी गणेश मंदिरपर्यंत पदयात्रा काढण्यात आली.त्याला शहर व परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण व शहरी भागातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये कडेगावचे अनिल तुळसनकर, चंदूरचे अध्यक्ष सचिन हळदे, हुपरी अध्यक्ष शंकरराव बेले, महादेव विभूते, तसेच प्रभाकर उरणे, राज्य खजिनदार किरण कोष्टी, चिंतामणी पारिशवाड, हेमंत वरुटे, श्रीकांत कबाडे, बनशंकरी ट्रस्टचे अध्यक्ष अमित कबाडे, किशोर बोळाज, मधुकर वरुटे यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी हटकर कोष्टी समाजाचे कोरोची अध्यक्ष विजय कडगावे , उपाध्यक्ष शिवा ठोंबरे ,विनायक लठ्ठे , प्रशांत गलगले  यांच्या सहसर्व संचालक मंडळ व महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी कोरोचीमधील समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.Post a Comment

Previous Post Next Post