भादोले येथील प्रभाग.क्र 6 मधील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था.प्रेस मीडिया लाईव्ह :

हातकणंगले तालुका प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे

 भादोले कडुन लाटवडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रभाग क्रमांक सहा असून या रस्त्यावर शासनाकडून हजारो रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहेत तसेच सार्वजनिक शौचालय वापरासाठी पाण्याची  सोयही करण्यात  आली आहे. 

  या सार्वजनिक शौचालयाचा वापर प्रभाग क्रमांक सहा मधील महिला व पुरुष करतात परंतू गेल्या कित्येक दिवसांपासून सदर शौचालयाची दोन्ही दरवाजाची  मोडतोड झाली असून  शौचालयात जाण्यासाठी महिला भगिनींना दरवाजा  उचलून ठेवावा लागतो दरवाजाला कडेकोडा नसल्यामुळे दरवाजा महिला वर्गाच्या अंगावर पडुन जीव धोक्यात येऊ शकतो तसेच शौचालयासाठी पाणी पुरवठा केला जातो तो सुध्दा बंद केलेला आहे.याबाबतची माहिती भादोले गावचे सरपंच याना महिती असून सुद्धा सरपंच साहेबांनी याकडे  दुर्लक्ष केले आहे 

            तेव्हा प्रभाग क्रमांक सहा मधील महिला व पुरुष वर्गातून शौचालय दरवाजाची दुरुस्ती व शौचालयास पाणी पुरवठा करण्याची मागणी  केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post