किरीट सोमय्या यांच्या पोलीस ठाण्यातील प्रत्येक हालचालीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग

किरीट सोमय्यांचाही पर्दाफाश होणार आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

भाजपा नेते किरीट सोमय्या वांद्रे आणि खार पोलिसांवर आरोप करत सुटले आहेत. पोलीस आयुक्तांवरही त्यांनी आरोप केला आहे. पोलीस ठाण्यातील त्यांच्या प्रत्येक हालचालीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले आहे.आजही झाले ते लवकरच बाहेर येणार असून सोमय्यांचाही पर्दाफाश होणार आहे.

आपल्यावरील हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्या आज खार पोलीस ठाण्यात गेले होते. हल्लेखोरांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. 'आपल्यावरील हल्ल्याचे प्रकरण दाबण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशाने वांद्रे पोलिसांनी खोटा एफआयआर नोंदवला. तो खार पोलीस ठाण्याला पाठवला गेला. आज दोन तास खार पोलिसांनी मला बसवून ठेवले. एफआयआर घेतो असे सांगितले. मात्र पोलीस आयुक्तांचा पह्न आला आणि सर्व कागदपत्रे फाडून टाकली गेली.' असा दावा सोमय्या यांनी पोलीस ठाण्याबाहेर आल्यानंतर केला.'वांद्रे पोलिसात केलेला एफआयआर वाचल्यानंतर त्याचा मधला भाग गायब असल्याचे लक्षात येते. सोमय्या यांनी फक्त एकच बारीक दगड लागल्याचे सांगितले असे त्यात म्हटले आहे. त्या एफआयआरवर माझी स्वाक्षरीही नव्हती.' असे प्रसारमाध्यमांना सोमय्या यांनी सांगितले.

…तेव्हा सीआयएसएफचे जवान काय करत होते..?

खार पोलीस ठाण्याबाहेर किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सीआयएसएफचे जवान काय करत होते? त्यांची चौकशी झाली पाहिजे असे पत्र मुंबई पोलिसांनी सीआयएसफच्या महासंचालकांना लिहिले असल्याचे सूत्रांकडून समजते.

Post a Comment

Previous Post Next Post