फटाक्यांवर कायमची बंदी येण्याची शक्यता

 न्यायालयाने फटाके बंदी बाबत  26 जुलैपासून सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याची तयारी .

प्रेस मीडिया लाईव्ह :

देशभरात धार्मिक हिंसाचाराच्या घटना घडत आहे याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सण उत्सवांत फटाकेबंदी लागू करण्याबाबत गंभीर भूमिका घेतली आहे दरवर्षी दिवाळी येते जाते व फटाक्यांचा मुद्दा जैसे थे राहतो आता मात्र आम्ही तसे होऊ देणार नाही असे स्पष्ट करीत न्यायालयाने फटाकेबंदीबाबत 26 जुलैपासून सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याची तयारी केली आहे त्यामुळे फटाक्यांवर कायमची बंदी येण्याची शक्यता आहे .

फटाकेबंदीचा मुद्दा अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.प्रदूषणकारी फटाक्यांची खरेदी-विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणाऱया विविध याचिका दाखल झालेल्या आहेत. त्या सर्व याचिकांवर 26 जुलैपासून अंतिम सुनावणी केली जाईल, असे न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मंगळवारी स्पष्ट केले. न्यायालय सर्वप्रथम मुख्य प्रकरणाची सुनावणी करेल. त्यानंतर यासंबंधित अवमान याचिकांवर सुनावणी घेईल. दरवर्षी दिवाळी येते-जाते. त्यावेळी फटाक्यांचा मुद्दा चर्चेत येतो. मात्र नंतर फटाकेबंदीचा मुख्य मुद्दा तसाच राहतो. परंतु आता आम्ही तसे होऊ देणार नाही, असे न्यायमूर्ती शाह यांनी नमूद केले.

मंगळवारच्या सुनावणीवेळी फटाके निर्मात्यांच्या वतीने अॅड. दुष्यंत दवे यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी एकटय़ा सर्वोच्च न्यायालयात 70 हजारांहून अधिक खटले प्रलंबित असल्याचे म्हणणे मांडले. त्यावर सुनावणी पुढे ढकलण्यासाठी वकिलांकडून केल्या जाणाऱ्या युक्तिवादांमुळेच हे खटले रेंगाळलेत. दररोज अशा प्रकारचे चार-पाच खटले येतात. मात्र फटाक्यांच्या बाबतीत आम्ही आता सुनावणीची रखडपट्टी होऊ देणार नाही, असे न्यायमूर्ती शाह यांनी बजावले.

गेल्या वर्षी दिवाळी दरम्यान फटाक्यांच्या वापरा बाबत सुनावणी झाली होती त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आम्ही कुठल्या एका उत्सव किंवा एका धर्माविरोधात नाहीत आम्ही इथे लोकांच्या जीवन जगण्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी बसलोय उत्सवांच्या नावाखाली कुणालाही नागरिकांच्या जिवाशी खेळण्यास मुभा देणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले होते .

देशभरात धार्मिक हिंसाचाराच्या घटना घडत आहे याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सण - उत्सवांत फटाकेबंदी लागू करण्याबाबत गंभीर भूमिका घेतली आहे दरवर्षी दिवाळी येते - जाते  फटाक्यांचा मुद्दा ' जैसे थे राहतो आता मात्र आम्ही तसे होऊ देणार नाही असे स्पष्ट करीत न्यायालयाने फटाकेबंदीबाबत 26 जुलैपासून सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याची तयारी केली आहे त्यामुळे फटाक्यांवर कायमची बंदी येण्याची शक्यता आहे .

Post a Comment

Previous Post Next Post