इचलकरंजीत रविवारी राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा

 विविध मान्यवरांची लाभणार उपस्थिती

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथील महालक्ष्मी महिला विकास संस्थेच्या वतीने रविवार दि. 24 एप्रिल रोजी घोरपडे नाट्यगृहात राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष सौ. दीपा पुजारी, सौ. अंजली आगलावे,सौ.लक्ष्मी बुरले यांनी संयुक्तपणे पत्रकार बैठकीत बोलताना दिली.

इचलकरंजी शहरातील महालक्ष्मी महिला विकास संस्थेच्या वतीने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जातात.याशिवाय सामाजिक बांधिलकी म्हणून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात.महिलांमधील सुप्त कलागुणांना अधिक वाव मिळावा ,या उद्देशाने या संस्थेने इचलकरंजी शहरात प्रथमच राज्यस्तरीय लावणी स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धा तीन गटात होणार आहे. यात लहान गट वय 5 ते 15 वर्षे , पुरुष गट लावणी सम्राट वय 15 ते 50 वर्षे  आणि महिला गट लावण्य सम्राज्ञी वय 15 ते 50 वर्षे यांचा समावेश आहे.लावण्य सम्राज्ञी लहान गटासाठी अनुक्रमे रोख पाच हजार रुपये , तीन हजार रुपये , दोन हजार रुपये व उत्तेजनार्थ असे बक्षीस आहे. तर मोठ्या गटासाठी अनुक्रमे रोख 11 हजार रुपये,9 हजार रुपये , 5 हजार रुपये व उत्तेजनार्थ बक्षीस योजना आहे. लावणी सम्राट मोठ्या गटासाठी अनुक्रमे 11 हजार रुपये ,9 हजार रुपये ,5 हजार रुपये व उत्तेजनार्थ बक्षीस ठेवण्यात आले असल्याची माहिती महालक्ष्मी महिला विकाससंस्थेच्या अध्यक्ष सौ. दीपा पुजारी, सौ. अंजली आगलावे,सौ.लक्ष्मी बुरले यांनी संयुक्तपणे पत्रकार बैठकीत बोलताना दिली.तसेच या स्पर्धेसाठी माजी खा. निवेदिता माने, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रांतिक सदस्यमदन कारंडे, उदयसिंह पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष

प्रकाश पाटील, विठ्ठल चोपडे, माधुरी चव्हाण, पै. अमृत भोसले, सिनेअभिनेत्री मोहिनी खोत, लावणी नृत्यागंना दीपाली मागंले, संगीतकार चंद्रकात जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post