प्रबोधिनी व वाचनालयाला विद्यार्थिनींची भेटप्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता. २९ , समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय या संस्थांची माहिती घेण्यासाठी व दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी मधील बीए भाग तीन च्या मराठी विभागाच्या विद्यार्थिनींनी संस्थेला भेट दिली. यावेळी संस्थेच्या वतीने सौदामिनी कुलकर्णी यांनी सर्वांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले.प्रबोधन वाचनालयातील ग्रंथसंग्रह, संदर्भ विभाग, बाल विभाग, नियकालिके आदी माहिती दिली.यावेळी विद्यार्थीनीनी प्रसाद कुलकर्णी यांची संस्थेचे काम आणि लेखन,वाचन,वक्तृत्व कौशल्य आदीबाबत मुलाखत घेतली.

विद्यार्थिनीनी प्रबोधिनीची पंचेचाळीस वर्षाची वाटचाल, तीस हजार ग्रंथ व शंभरावर नियतकालिकानी समृद्ध प्रबोधन वाचनालय, गेले तेहेतीस वर्षे सुरू असलेले 'प्रबोधन प्रकाशन ज्योती ' मासिक, इतर उपक्रम व सातत्यपूर्ण होणारे कार्यक्रम आदींची माहिती मुलाखतीतुन जाणून घेतली .प्रा. प्रतिभा पैलवान आणि प्रा.डॉ.प्रियांका कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पल्लवी साळुंखे,करीना मकूभाई, निशा कोरे, अपूर्वा दरिबे, शिवानी गेजगे,अक्षदा कांबळे, कोमल पाटील, नेहा कांबळे ,अमिषा काकडे ,ऋतुजा पवार,प्रणाली पगडे,निकिता पाटील आदींचा सहभाग होता.या भेटी व मुलाखतीसाठी प्राचार्य डॉ.अनिल पाटील व प्रा.डॉ.सुभाष जाधव यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post