14. मार्चला पुणे महानगरपालिकेचा कार्यकाल संपणार

सर्वच लोकप्रतिनिधींना चिंता आपण केलेल्या विकास कामांचे श्रेय दुसरेच घेणार..? 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : जिलानी उर्फ मुन्ना शेख :

 पुणे :.   14. मार्चला पुणे महानगरपालिकेचा कार्यकाल संपणार असून  त्यानंतर महानगरपालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. शिवाय ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून निवडणूक लांबली तर आपल्या प्रभागात केलेली विकासकामे  काय..? 


आपण केलेल्या  विकास कामांचे श्रेय दुसरेच घेणार या भीतीने  येत्या दहा दिवसात अशा कामांची उद्‌घाटने  लवकरात लवकर उरकण्यावर सत्ताधारी भाजप तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनाच्या नगरसेवकांची चांगलीच पळा पळ होणार आहे. महानगरपालिकेचा कार्यकाल अवघे दहा दिवसात संपणार असून आहे. भाजपची सत्ता असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या कार्यकाळात 2019 आणि 2020 ही वर्षे करोना कालावधीत गेली. हा काळ सर्वच दृष्टीकोणातून त्रासदायक ठरला आहे. त्यामुळे भाजपला सत्तेची तशी तीनच वर्षे मिळाली आहेत व त्यातच या तीन वर्षांत शहर, उपनगरांतील विकासकामांचे श्रेय घेण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात सातत्याने वादविवाद सुरू आहेत  . गेल्या पाच वर्षांत भाजपने शहराचा कायापालट केला असून त्याचे आयते श्रेय आता राष्ट्रवादी घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा भाजप कडून  सांगितले जातय . 

आता, आगामी महानगरपालिकेचा निवडणुकीचा बिगुलही प्रभाग रचनेतून वाजण्यास जोरदार सुर् वात झाली आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कायम असला तरी आपापल्या प्रभागातील विकासकामांची उद्‌घाटने करून घेण्यासाठी नगरसेवकांचे जोरदार  प्रयत्न असणार आहेत. दि. 6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी महानगरपालिकेत येत असल्याने सर्व  मोठे नेते शहरात असणार आहेत. पंतप्रधानांचा कार्यक्रम काही  तासांचाच असल्याने त्या नंतर राज्यपातळीवरील अन्य नेत्यांना आपल्या प्रभागात घेऊन जाण्याचे प्रयत्न नगरसेवकांचे आहेत. या साठी एक दिवस आगोदर   मुहूर्तही साधण्याचा प्रयत्न  असणार आहे.     राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनीही अनेक कार्यक्रमांची उद्‌घाटने, शुभारंभाचे कार्यक्रम ठेवण्याचा किंवा मेळाव्यासाठी नेत्यांची वेळ मिळवण्याचा प्रयत्न जोरदार सुरू आहे.या वेळची महानगरपालिकाची निवडणूक सर्वांची झोप उडविणारी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post