अवैध गांजा , मादक व नशाकारक पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले जेरबंद



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

दिनांक 25/03/2022 रोजी रायगड जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटण करणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग यांना योग्य ती कारवाई करणेबाबत आदेशीत करण्यात आले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग यांचे अधिपत्याखाली सपोनि / श्री. पवनकुमार ठाकूर, सफौ/ देवराम कोरम, पोह/1820 राजेश पाटील, पोह/799 अमोल हंबीर, पोह/851 प्रशांत दबडे, पोह/727 विकास खैरनार यांचे पथक नेमण्यात आले होते.

सदर पथक खालापूर विभागागाकडे अवैध धंद्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पथकातील पोह/राजेश पाटील यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने मौजे मुळ गाव खोपोली गावच्या हद्दीत अखंड खोपोली हनुमान मंदिराचे समोर इसम नामे हमजा निजामुद्दीन खोपोलीवाला रा. खोपोली, ता.खालापूर यास त्याच्या ताब्यातील वॅगनआर कारसह ताब्यात घेतले असता सदर गाडीमध्ये 6.394 किलो ग्रॅम वजनाचा एकूण 76,700/- रुपये किमतीचा मादक अंमली पदार्थ गांजा मिळुन आला. सदर इसमाकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने सदरचा गांजा स्थानिक पातळीवर विक्री करण्यासाठी आणला असल्याची प्राथमिक माहिती दिली. सदरबाबत आरोपीत याचेविरुद्ध खोपोली पोलीस ठाणे गु.र.नं.80/2022 गुंगीकारक औषधे व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क) 20 वैगरे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास खोपोली पोलीस ठाणे करीत आहे.

अटक आरोपी :- हमजा निजामुद्दीन खोपोलीवाला, वय-32 वर्ष रा. आशियाना बिल्डींग, चौथा मजला, प्लॅट नंबर 401, खोपोली बाजारपेठ, ता. खालापूर

जप्त मुद्देमाल : (1) 76,700/- रुपये किमतीचा 6.394 किलोग्रॅम वजनाचा गांजा हा मादक व नाशकार्क पदार्थ 12,000/- रुपये प्रतिकिलो प्रमाणे किमत अंदाजे

(2) 2,00,000/-रुपये किमतीची वॅगनआर कार क्र.एम.एच.01 BE 0282 जु.वा. किं. अं.

एकूण हस्तगत मुद्देमाल 2,76,700/- रुपये

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक श्री. दयानंद गावडे यांचे अधिपत्याखाली सपोनि/श्री.पवनकुमार ठाकुर, सफौ/ देवराम कोरम, पोह/1820 राजेश पाटील, पोह/799 अमोल हंबीर, पोह/851 प्रशांत दबडे, पोह/727 विकास खैरनार या पथकाने केलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post