ब्रेकिंग न्यूज : पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने

  राष्ट्रवादीचे उमेदवार प्रदीप गायकवाड यांचा पराभव. 


प्रेस मीडिया लाईव्ह :

जीलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे -  पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी हेमंत रासने यांची चौथ्यांदा निवड झाली असून  या निवडणुकीत हेमंत रासने यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रदीप गायकवाड यांचा पराभव केला. रासने यांना 10, तर गायकवाड यांना 6 मते मिळाली. दरम्यान, रासने यांचे अध्यक्षपद पुढील 14 दिवसांसाठी असणार आहे.


महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची मुदत दिनांक 28 फेब्रुवारीला संपली होती. तर, महानगरपालिका सभागृहाची मुदत 14 मार्च रोजी संपत आहे. त्या मुळे प्रशासनाने ही निवडणूक घेतली होती. स्थायी समितीत या 14 दिवसांसाठी भाजपने आपल्या सर्व विद्यमान सदस्यांना दिली. तर राष्ट्रवादीने आपले दोन सदस्य बदलले होते. मात्र, स्थायी समितीत सर्वाधिक 10 सदस्य भाजपचेच असल्याने हेमंत रासने यांचा विजय निश्‍चित  असल्याचे मानला जात होता.

स्थायी समिती मध्ये राष्ट्रवादीचे चार, शिवसेना व कॉंग्रेसचे प्रत्येकी एक असे एकूण 16 सदस्य आहेत. त्यामुळे हेमंत रासने यांची निवड ही औपचारिकता होती. तरीही दगाफटका टाळण्यासाठी भाजपने सर्व सदस्यांना 'व्हीप' बजावला होता. हेमंत रासने यांच्या निवडीनंतर महापौर मुरलीधर मोहोळ, स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी हेमंत रासने यांचे अभिनंदन केले. नगरसेवक राहूल भंडारे, राजाभाऊ लायगुडे, दीपक पोटे, धनराज घोगरे, जयंत भावे, महेश बावळे आदी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post