सेप्टिक टँकची साफ सफाई करताना चार मजुरांचा गुदमरून मृत्यू

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे प्रतिनिधी : जीलानी उर्फ मुन्ना शेख :

पुण्यातील लोणी काळभोर परिसरात एका इमारतीतील सेप्टिक टँकची साफ करताना चार मजुरांचा गुदमरून  मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. तर घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.  या  घटने बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी अकराच्या घडली .सोसायटी पुणे शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी काही लोक कदमवाक वस्तीच्या मागे असलेल्या रहिवासी संकुलातील सेप्टिक टँकची साफ सफाई करत होते.  या टाकीतील विषारी वायू मुळे चौघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहिती नुसार, प्रथम दोघे जण टाकीची साफ सफाई करत असल्याचे प्रथम दर्शनी दिसते. त्याचा दम गुदमरताना दिसताच आणखी दोन जण त्याला वाचवण्यासाठी टाकीत घुसले. पण ,  चौघांचाही मृत्यू गुदमरल्यानेच झाला. मृतां मध्ये दोघेजण हे सेप्टिक टँकच्या साफ सफाईचे काम करत होते तर दोघे जण या सोसायटीतील दैनंदिन काम पाहत होते. सिकंदर उर्फ दादा पोपट कसबे (वय -४५) रा.पाण्याची टाकी संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली), पद्माकर मारुती वाघमारे (वय-४३, पठारे वस्ती), कृष्णा दत्ता जाधव (वय- २६ रा. देशमुख वस्ती, देगाव, ता. उत्तर सोलापूर, सोलापूर), रुपेश उर्फ सुवर्ण कांबळे, (वय- ४५ ) घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post