हिजाब आवश्यक आहे की नाही हे मौलवी ठरवतील, न्यायाधीश नाही"...भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी


प्रेस मीडिया लाईव्ह :

 नवी दिल्ली : हिजाब  कुरानचा भाग नाही, पण मुलींनी शालीन कपडे परिधान करावेत हे इस्लाममध्ये सांगण्यात आलं आहे. शाळेच्या गणवेशा मध्ये शिखांची पगडी आणि सिंदूर लावलेले चालते मग हिजाब घालण्यास काय हरकत आहे..? हिजाब आवश्यक आहे की नाही हे मौलवी ठरवतील, न्यायाधीश नाही". असे वक्तव्य भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी केले आहे. 

गेल्या चार-पाच महिन्यांपासून देशभरात शिक्षण संस्थांमध्ये हिजाब परिधान करण्यावरून वादंग सुरूच आहे. या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्याच शिक्षण संस्थामध्ये हिजाब अनिवार्य नसल्याचा निकाल दिला. मात्र न्यायालयाने निकाल देऊनही यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येतच आहेत. यात काहींनी न्यायालयाच्या निकालाचं स्वागत केले आहे तर काहींनी या निकालावर निराशा व्यक्त केली आहे. एस. वाय. कुरेशी हेही या निकालावर नाराज असल्याचे दिसून येत आहे.


दरम्यान, गेल्या आठवड्यात कर्नाटक उच्च न्यायालयाने  हिजाब वादावर अंतिम निर्णय दिला. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब अनिवार्य नाही असे म्हणत न्यायालयाने हिजाब बंदीला विरोध करणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. हिजाब गणेशाचा भाग असू शकत नाही, हिजाब घालणं इस्लाम  धर्मात अनिवार्य नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रितुराज अवस्थी आणि न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित आणि जे.एम. खाजी या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली.दरम्यान, कुरेशी यांनी लव जिहाद प्रकरणीही भाष्य केलं आहे. ते म्हणाले,"लव जिहाद हा एक प्रोपगंडा आहे. यात मुस्लीम मुलींना अधिक धोका आहे. कारण त्यांच्या नजरेतून पाहिलं तर भारतातील हिंदू तरुणी मुस्लीम मुलांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यामुळे मुस्लिम तरुणांचंच लव जिहादमुळे जास्त नुकसान होतं, अशी विधानेही त्यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post