एमआयएमचा कट असून, तो उधळून लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या

 विरोधक विरोध करत राहणार पण तितक्याच ताकदीने आता आपण प्रत्युत्तर दिले पाहिजे .. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : एमआयएमने महाविकास आघाडी सोबत जाण्यास तयार असल्याचा प्रस्तावा खासदार इम्तियाज जलील शनिवार दिला होता पण त्यानंतर खासदारांसोबत पार पडलेल्या बैठकीत हा सर्व एमआयएमचा कट असून, तो उधळून लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. या सोबतच हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवण्याचा देखील सांगण्यात आले आहे. महाविकास आघाडीत एमआयएमच्या युती बाबतच्या प्रस्तावानंतर विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.


दरम्यान, त्यावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाष्य करत हा कट असून तो उधळून लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. विरोधक विरोध करत राहणार पण तितक्याच ताकदीने आता आपण प्रत्युत्तर दिले पाहिजे असेही ठाकरे यावेळी सांगितले. महाविकास आघाडीतील युतीच्या प्रस्तावावर तिनही पक्षांकडून नाकारण्यात आले होते. त्यानंतर या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, एमआयएमचा हा कट असून तो उधळून लावण्याबरोबरच हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवा, एमआयएमचा कट अधळून लावण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांना दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post