खासगी वाहनावर 'पोलीस' या नावाची पाटी अथवा स्टिकर लावल्यास शिस्तभंगाची कारवाई

सर्व प्रभारी पोलीस निरीक्षकांना आदेश  देण्यात आले आहेत.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांचे नातेवाईक त्यांच्या खासगी वाहनांवर 'पोलीस' अशी पाटी लावतात तसेच पोलिसांचे चिन्ह असलेले स्टिकर लावून गाडय़ा चालवतात. हा प्रकार ताबडतोब बंद करून खासगी वाहनावर 'पोलीस' या नावाची पाटी अथवा स्टिकर लावू नका अन्यथा संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

बहुतेक पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांचे नातेवाईक त्यांच्या खासगी वाहनावर पोलीस अशी लाल रंगाची पाटी लावतात नाहीतर पोलिसाचे स्टिकर लावून गाडय़ा चालवत असल्याने त्या विरोधात अनेक तक्रारी वरिष्ठांकडे येत होत्या. याबाबत उच्च न्यायालयाने देखील नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व नागरिकांना समान कायदा या तत्त्वानुसार पोलिसांनीच कायद्याचे उल्लंघन करणे पोलिसांची प्रतिमा मलीन करण्यासारखे आहे. 'पोलीस' पाटी लावलेली वाहने नाकाबंदी तसेच सुरक्षा तपासणी न होता सोडली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

पोलीस पाटीचा वापर करून घातपात घडविला जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. या सर्व बाबींचा विचार करता ज्या अधिकारी, अंमलदार किंवा त्यांच्या नातेवाईकांनी खासगी वाहनावर पोलीस पाटी लावली असेल तर ती यापुढे लावू नये. तसेच जर कोणी गाडीवर पोलीस पाटी, स्टिकर लावलेले सापडले. तर संबंधित अधिकारी, अंमलदारावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे आदेश सर्व प्रभारी पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post