केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीत.

 जुहू येथील आदीष बंगल्यातील अनधिकृत बांधकाम १५ दिवसांत हटवण्याची नोटीस मुंबई महानगरपालिकेने जारी केली 

नारायण राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष वाढण्याची शक्यता..


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीत. नारायण राणे यांच्या जुहू येथील आदीष बंगल्यातील अनधिकृत बांधकाम १५ दिवसांत हटवण्याची नोटीस मुंबई महानगरपालिकेने जारी केली आहे.अन्यथा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बंगल्यातील बांधकाम कलम ४७५ अ च्या अंतर्गत पाडण्यात येणार, असल्याचे नोटीसी मध्ये म्हटले आहे. येत्या पंधरा दिवसांत अनधिकृत बांधकाम तोडा अन्यथा महानगरपालिकेला कारवाई करावी लागेल, असेही नोटीसी मध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता नारायण राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, महनगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नारायण राणेंच्या आदीश बंगल्याची पाहणी केली होती. या पाहणीमध्ये राणे यांनी बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले होते. या संदर्भात राणे यांना मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत कलम 351, 352, 352A आणि 354A खाली नोटीस बजावण्यात आली होती.


पालिकेच्या नोटीसी नुसार केलेले बदल

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी 18 फेब्रुवारी रोजी राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यामध्ये बंगल्यातील प्रत्येक मजल्यावर बेकायदा बदल करण्यात आल्याचे म्हटले होते. आठ पैकी सात मजल्यावर पालिकेला बेकायदा बांधकाम आढळले आहे. पाहणीत महानगर पालिकेने मंजूर केलेल्या आराखड्याची तुलना करुन इमारतीत बेकायदा बदल झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. हे बेकायदा बांधकाम आपण का काढणार नाही याचे उत्तर ७ दिवसात द्यावे, अशा आशयची ही नोटीस राणे यांना आधीच दिली होती. त्यानंतर आता महानगरपालिकेने बांधकाम पाडा अन्यथा कारवाई होईल, असा इशारा दिला आहे.

पहिला ते तीसरा मजला गार्डनमध्ये खोली तयार करण्यात आली.

चौथा मजला : गच्चीवर खोलीचे बांधकाम

पाचवा मजला : गार्डन टेरेस मध्ये खोली बांधली.

सहावा मजला : पार्ट टेरेस मध्ये खोलीचे बांधकाम

आठवा मजला : पॉकेट टेरेस आणि गार्डन टेरेसमध्ये बांधकाम

गच्ची : पॅसेज एरिया मध्ये बांधकाम केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post