माजी आमदार अनिल गोटे यांचे ईडीला पत्र

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी .

इक्बाल मिर्चीशी संबंधित असणाऱ्या एका बड्या बिल्डर कडून पैसे घेतल्याचा आरोप गोटे यांनी केला . 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी ईडीला पत्र लिहिले आहे. या पत्रा मध्ये त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी ड्रग्ज माफिया असणाऱ्या इक्बाल मिर्चीशी संबंधित असणाऱ्या एका बड्या बिल्डर कडून पैसे घेतल्याचा आरोप गोटे यांनी केला . 


इक्बाल मिर्ची हा 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी आहे. तथापि, फडणवीस यांनी गोटे यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गोटे यांनी लिहिलेल्या पत्रात 2014 पर्यंत या बिल्डरने भाजपाला कधी निधी दिला नव्हता असेही म्हटले आहे. मात्र राज्या मधील भाजपाची सूत्र फडणवीस यांच्या हाती जाताच भाजपाने आरकेडब्ल्यू डेव्लपर्सकडून 20 कोटींचा निधी घेतला. ही कंपनी राजेश वाधवान यांच्या मालकीची असून सध्या ते पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी तुरुंगामध्ये आहेत.

जर मलिक यांना दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपांवरुन अटक होऊ शकते तर ईडीने हाच तर्क भाजपा साठी ही लावले पाहिजे आणि फडणवीस यांना तातडीने अटक केली पाहिजे. मी या संदर्भात ईडीला पत्र लिहिले असल्याचे गोटे म्हणाले.केंद्रीय यंत्रणां मधील अधिकाऱ्यांचा भांडाफोड केल्यानंतर मलिक यांच्या विरोधात राजकीय हेतूने पुरावे पेरुन त्यांना अडकवण्यात आल्याचा आरोपही गोटेंनी केला आहे. गोटे यांनी या प्रकरणा संदर्भात आपण निवडणूक आयोगाच्या माहितीच्या आधारे भाजपाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भातील माहिती ईडीला पुरावे म्हणून दिल्याचेही म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देणगी देणाऱ्यांची संपूर्ण यादी उपलब्ध आहे.मलिक यांच्यावर आरोप करण्याआधी फडणवीसांनी दाऊदशी संबंध असणाऱ्या एका व्यक्तीकडून भाजपा एवढ्या मोठ्याप्रमाणात निधी कसा घेते हे सांगाव, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post