टपरीवर मिळणारा चहा आता दोन रुपयाने महागला..

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई | महाराष्ट्रात  टपरीवर मिळणारा  चहा आता  दोन रुपयाने महाग झाला आहे, टी आणि कॉफी असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. राज्यात साखर, दूध आणि चहा पावडर या सामग्रीच्या किंमतीत वाढ झाल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती चहा आणि कॉफी असोसिएशन दिली आहे.चहाच्या सध्याच्या दरा पेक्षा दोन रुपये आकारण्यात येणार आहे. सध्या रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे.  व या युद्धाचा परिणाम जगभरात पडलेले स्पष्ट दिसत आहे.


गेल्या २१ दिवसांपासून रशिया-युक्रेनचेय युद्ध सुरू आहे. यामुळे जगभरात कच्चा तेल्यांच्या किंमतीत कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या युद्धाची जळ भारताला सुद्धा सोसावली लागत आहे. देशात तेलाच्या किंमती वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकट आणि अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीशी झुंज देत आहे. या पार्श्वभूमीवर देशा सह राज्यात अन्नधान्य आणि डाळींच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे.या महागाई मुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.

          चहा चाळीस मिली. मिळणार..!

पूर्वी पाच रू.देऊन 100 मिली चहा मिळायचा आता दहा रुपये देऊन  पन्नास मिली मिळतो, त्यात दोन रू.वाढल्याने  चहा 40 मिलीच मिळणार..


Post a Comment

Previous Post Next Post