घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ

 सततच्या महागाई मुळे  सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले , शिवाय बजेट सुद्धा कोलमडले


प्रेस मीडिया लाईव्ह :

 देशात महागाईचा भडका उडालेला आहे. पेट्रोल डीझेलच्या दरवाढी नंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून या मुळे आता सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. शिवाय    बजेट सुद्धा कोलमडले आहे. रशिया- युक्रेन युद्धांचा मोठा परिणाम इंधन दरवाढी वर झाला आहे.

इंडियन ऑईलनुसार घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपये प्रति सिलिंडर दरवाढ झाली आहे. या नव्या किंमती आजपासूनच लागू होणार आहेत. ही दरवाढ १४.२ किलोच्या सिलिंडवर करण्य़ात आली आहे. यामुळे आजपासून या सिलिंडरच्या किंमती 949.50 प्रति सिलिंडर असणार आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडणार आहे मुंबईत आता एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 949.50 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये 976 रुपये, तर चेन्नईत 965.50 रुपये इतका दर झाला आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post