कोटीतीर्थ तलावातील मोठे मासे आज अचानक पडले मृत्युमुखी

डिझॉल ऑक्सिजनचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा जास्त त्यामुळे मोठ्या आकाराचे मासे मृत

प्रेस मीडिया लाईव्ह: 

कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर: कोटीतीर्थ तलावातील मोठे मासे आज अचानक मृत्युमुखी पडले. येथील नागरिकांनी मासे पाण्याबाहेर काढले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे नमुने तपासले असता त्यात डिझॉल ऑक्सिजनचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा जास्त होते.त्यामुळे मोठ्या आकाराचे मासे मृत कसे झाले, हे अस्पष्ट आहे. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, महापालिका पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

कोटीतीर्थ तलावात आज सकाळी पाण्यावर मृत मासे तरंगताना दिसले. तेथील नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना बोलावले. समीर व्याघ्रांबरे यांनी येऊन परिस्थितीची पाहणी केली. आकाराने मोठे असलेले मासे अधिक प्रमाणात मृत झाले होते. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी डॉ.अर्जुन जाधव आणि कर्मचाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले व त्याची तपासणी केली. दुपारी १ च्या सुमारास अतिरिक्त आयुक्त देसाई आले. माजी नगरसेवक नियाज खान म्हणाले, 'तलावाची दुर्दशा होईपर्यंत महापालिकेने काही केले का नाही, यावर देसाई म्हणाले, 'कोटीतीर्थ तलावाचा विकास आराखडा मंजूर आहे. निविदाही निघाली आहे. लवकरच काम सुरू होईल. अग्निशमन दलाने बोटीने मृत मासे बाहेर काढले.या बाबत 'कॉमन मॅन संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, 'मासे ही सार्वजनिक मालमत्ता आहे. हेतू पुरस्सर मासे मारले असतील तर त्यांच्यावर फौजदारी करावी.

Post a Comment

Previous Post Next Post