इचलकरंजीत धार्मिक पध्दतीने होळी सण साजरा

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहर परिसरात पारंपरिक धार्मिक पद्धतीने होळी सण उत्साहात साजरा करण्यात.सकाळी घरगुती होळीचे पूजन करण्यात आले.तर सायंकाळी सार्वजनिक मंडळांनी शासकीय नियमांचे पालन करत धार्मिक पध्दतीने होळी पूजन करुन दहन केले.यावेळी चिमुकल्यांनी शेणीच्या होळी भोवती बोंब मारत वाईट कर्मांचा त्याग करून चांगल्या कर्मांचे अनुकरण करण्याचा संदेश दिला.यानिमित्ताने बाल चिमुकल्यांसह नागरिकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पसरले होते.

हिंदू संस्कृतीत होळी सणाचे मोठे धार्मिकता महत्व आहे.त्यामुळे या सणाची संस्कृती पूर्वापार चालत आली आहे.यामध्ये काही प्रमाणात बदल झाले असले तरी मूळ उद्देश मात्र कायम आहे.होळी सणासाठी लागणारे लाकूड व शेणी उपलब्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची तोड होत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने यावर कडक निर्बंध लादून या  निर्बंधांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे.त्यामुळे बहुतांश ठिकाणी लाकडाऐवजी

मोजकी शेणी गोळा करुन होळी दहन करण्याची पध्दत अवलंबली जात आहे.याच अनुषंगाने आज गुरुवारी इचलकरंजी शहर परिसरात सकाळी घरगुती होळीचे पूजन करण्यात आले.तर सायंकाळी सार्वजनिक मंडळांनी शासकीय नियमांचे पालन करत धार्मिक पध्दतीने होळी पूजन करुन दहन केले.तत्पूर्वी ,होळीचे विधीवत पूजन करुन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत आला.

यावेळी चिमुकल्यांनी होळी रे होळी ,पुरणाची पोळी व बोंबला रे बोंबला ,जोरात बोंबला अशा घोषणा देत शेणीच्या होळी भोवती बोंब मारत वाईट कर्मांचा त्याग करून चांगल्या कर्मांचे अनुकरण करण्याचा संदेश दिला.यावेळी नागरिकांबरोबरच चिमुकल्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.दरम्यान , पोलिस प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर परिसरातील विविध ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

Previous Post Next Post