तबसुम जमादार भूगोल पदवी परीक्षेत विद्यापीठात प्रथम


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी -शहापूर परिसरातील शिवाजी विद्यापीठाची विद्यार्थीनी तबसुम रसूल जमादार हिने भूगोल पदवी परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला.याबद्दलऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या पदवी दिक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते तिला पी.डब्लू . देशमुख पारितोषिक व भूगोल शाखेची सिल्वर जुबिली स्काॅलरशिप देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी राज्याचे अभियांत्रिकी शिक्षणमंत्री उदय सामंत , शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डी.टी.शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.या यशाबद्दल तिचा विविध संस्था ,संघटनांबरोबरच मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या



इचलकरंजी - शहापूर परिसरातील तबसुम रसूल जमादार या विद्यार्थीनीने जिद्द , चिकाटी व अभ्यासाच्या प्रयत्नातील सातत्याने भूगोल पदवी परीक्षेत शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला.या यशाबद्दल ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या पदवी दिक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते तिला पी.डब्लू . देशमुख पारितोषिक व भूगोल शाखेची सिल्वर जुबिली स्काॅलरशिप देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी राज्याचे अभियांत्रिकी शिक्षणमंत्री उदय सामंत , शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डी.टी.शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.या यशाने इचलकरंजी शहराच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यासाठी तिला शिवाजी विद्यापीठाचे प्रा. जगदीश सपकाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल तिचा इचलकरंजी शहर परिसरातील विविध संस्था व संघटनांबरोबरच मान्यवर व्यक्ती व भागातील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे नामवंत वकील आप्पासाहेब घोरपडे ,कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश वाघमारे ,माजी नगरसेवक किसन शिंदे ,सोशल क्रेडीट सोसायटीचे चेअरमन श्री. खलिफा , उद्योगपती राज बारगीर ,युवा ग्रुप ,इंडो किड्स स्कूलचे चेअरमन एन.एन.काझी ,जीवन विद्या मंदिरच्या अध्यक्षा मेघा  भाटले ,मुख्याध्यापिका सौ. भिलवडे , हुतात्मा अब्दुल हमिद विद्या मंदिरचे सर्व शिक्षक , मधुकर मगदूम ,युवा मंच , रेशन धान्य दुकान महासंघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे ,यादववाडी विद्या मंदिर शिरोलीचे मुख्याध्यापक शानुर कमालशा ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष  हिदायत मणेर , कर्जदार - जामीनदार हक्क बचाव संघर्ष कृती समिती ,फिरोज मुजावर ,संजय पेटकर,  मोहम्मद शेख ,प्रकाश राक्षे ,, नंदकुमार लोखंडे यांचा समावेश आहे.तसेच राष्ट्रवादी विणकर सेवा संघाकडून विणकर पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला .या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post