भारत मातेच्या वीर जवानांना वाहिली दीप आदरांजली



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथे युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने शहिद भगतसिंग उद्यान मध्ये भारत मातेच्या स्वातंञ्यासाठी बलिदान देणाऱ्या शहिद भगतसिंग, शहिद सुखदेव, शहिद राजगुरू यांच्या ९१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना दीप आदरांजली वाहण्यात आली.तसेच शहिद दिनाचे औचित्य साधून शहिद ऋषिकेश जोंधळे व शहिद रोहित चव्हाण यांच्या कुटूंबास मान्यवरांच्या हस्ते शहिद स्मृती चिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


इचलकरंजी शहरातील युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवून सर्वसामान्य जनतेस न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो.तसेच विविध सण , उत्सवाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात.नव्या पिढीमध्ये त्याग , बलिदान आणि देशभक्तीची प्रेरणा जागृत व्हावी ,याच उद्देशाने या संघटनेच्या वतीने शहिद भगतसिंग उद्यानमध्ये भारतमातेच्या स्वातंञ्यासाठी बलिदान देणाऱ्याशहिद भगतसिंग, शहिद सुखदेव, शहिद राजगुरू यांच्या ९१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना दीप आदरांजली वाहण्यात आली.तसेच 

शहिद दिनाचे औचित्य साधून शहिद ऋषिकेश जोंधळे व शहिद रोहित चव्हाण यांच्या कुटूंबास प्रमुख पाहुणे कर्नल पी.सी.पवार ,ए.पी आय.विकास आडसूळ , प्राचार्य श्री.ढेकळे , श्री.धुमाळ ,श्री.विरकर, दशरथ माने व अन्य मान्यवरांच्या हस्ते शहिद स्मृती चिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.तत्पूर्वी , मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी व शहिद भगतसिंग यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित नागरिकांनी विशेषता महिला ,युवती  तसेच चिमुकल्यांनी दीप प्रज्वलीत करुन भारतमातेच्या स्वातंञ्यासाठी शहिद झालेल्या वीर जवानांना आदरांजली वाहिली.

यावेळी शहिद ऋषिकेश जोंधळे व शहिद रोमित चव्हाण यांचे व्हिडिओ चित्रीकरण दाखवताना व शहिद कुटुंबीय बोलताना उपस्थित नागरिकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. यावेळी युवा महाराष्ट्र सेना संस्थापक राज्याध्यक्ष सॅम आठवले, कृष्णा जावीर, सचिन बेलेकर, राहुल लोकरे, तोसिफ इनामदार, अवधूत भोई, रोहित कल्याणकर, रोहित भोसले,बिरू माने, सतिश कवडे, रविंद्र कवडे, ऋषिकेश परीट, महेंद्र मस्कर, नितीन बेलेकर, प्रमोद बुचडे यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post