बाचणीचा जय हनुमान कबड्डी संघ ठरला कै.इंदुमती आवाडे स्मृती चषकाचा मानकरी

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी /प्रतिनिधी


येथील ए. जे सोशल वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने व डायनॅमिक मंडळाच्या सहकार्याने जागतिक  महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय महिलांच्या कबड्डी - स्पर्धेत बाचणीचा जय हनुमान कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळवून कै.इंदुमती आवाडे स्मृती चषकाचा मानकरी ठरला.या स्पर्धेतील विजेत्या संघांना माजी खासदार कल्लाप्पाणा आवाडे ,शिवशक्ती पक्षाच्या करुणा मुंडे ,बहुजन रयत परिषदेच्या प्रदेश अध्यक्षा कोमल साळुंखे  ,मैञी फौंडेशनच्या माधुरी आवळेकर यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.

इचलकरंजी येथील ए.जे.सोशल वेल्फेअर फौंडेशनच्या वतीने व डायनॅमिक मंडळाच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त डायनॅमिक मंडळाच्या मैदानावर नुकताच जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये १४ संघ सहभागी झाले होते.अत्यंत चुरशीने पार पडलेल्या या स्पर्धेत बाचणीचा जय हनुमान कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळवून कै.इंदुमती आवाडे स्मृती चषकाचा मानकरी ठरला.तर वडणगेच्या जय किसान संघाने व्दितीय ,कोरोचीच्या साई संघ तृतीय ,इचलकरंजीच्या डायनॅमिक संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला.

तसेच डायनॅमिक संघाची खेळाडू साक्षी जाधव हिने उत्कृष्ट चढाई  ,साई संघाची खेळाडू ऋतुजा अवघडे हिने उत्कृष्ट पकड , ,जय हनुमान संघाची खेळाडू प्रतिक्षा पिसे हिने अष्टपैलू खेळाडू ,जय किसान संघाची खेळाडू ऋतुजा लांडगे हिने उत्कृष्ट खेळाडू म्हणून यशस्वी कामगिरी पार पाडली.या स्पर्धेतील विजेत्या संघांना माजी खासदार कल्लाप्पाणा आवाडे ,शिवशक्ती पक्षाच्या करुणा मुंडे ,बहुजन रयत परिषदेच्या प्रदेश अध्यक्षा कोमल साळुंखे ,,मैञी फौंडेशनच्या माधुरी आवळेकर यांच्या हस्ते तसेच ए.जे.सोशल वेल्फेअर फौंडेशनच्या अध्यक्षा अबोली जिगजिनी , छञपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील ,आधार रेस्क्यू फोर्सचे डॉ.शंकर पोवार ,राजू कोरगांवकर , गणेश अमृतकर,अनिल चिले ,उत्तम कागले ,डायनॅमिक मंडळाचे अध्यक्ष संजय कुडचे , कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सह सेक्रेटरी  प्रा.शेखर शहा ,भूषण शहा , अतुल बुगड यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी प्रथम क्रमांक पटकावलेल्या बाचणीच्या जय हनुमान कबड्डी संघास कै.इंदुमती आवाडे स्मृती चषक देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे कोमल साळुंखे , करुणा मुंडे ,प्रमोद पाटील , डॉ.शंकर पोवार , अनिल चिले ,उत्तम कागले आदींनी ए.जे.सोशल वेल्फेअर फौंडेशनने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कबड्डी स्पर्धा आयोजित करुन समाजासमोर आदर्श उदाहरण घालून दिल्याचे गौरवोद्गार काढले.

यावेळी माजी खासदार कल्लाप्पाणा आवाडे यांनी पूर्वीच्या व आताच्या कबड्डी स्पर्धेतील फरक विषद करुन अशा स्पर्धांमधून स्वत:ची क्षमता सिद्ध करणा-या खेळाडूंना आमदार प्रकाश आवाडे यांच्या माध्यमातून विविध स्वरुपात मदत मिळवून देवू ,अशी ग्वाही दिली.तसेच विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा पञे सुपूर्द केली.यावेळी

दिलीप शिंदे ,बाळू काकडे ,भाऊ आडसूळे , निखिल गोरे ,वसिम बागवान ,विजय गुरव ,सूरज मुरगुंडे , विकास जित्ती ,जमीर फनीबंध , नामदेव पवार ,विजय जयताळकर यांच्यासह विविध मान्यवर , खेळाडू व क्रीडा प्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post