दोन महिन्यात कर्ज द्या, अन्यथा एकाही अधिकाऱ्याला कार्यालयात बसू देणार नाही- अविनाश शिंदे



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे 

         महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची थेट कर्ज प्रकरण  2 -3 वर्षापासून  वितरण झाली नाहीत. या विषयावर रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आ) यांच्या  वतीने महामंडळ कार्यालयासमोर आंदोलने करून  निवेदने देऊनही अद्याप एकही रुपयाचे  कर्ज वितरण केले नाही. म्हणून पुन्हा RPI युवक आघाडीच्या वतीने 3 मार्च रोजी कोल्हापूर महामंडळाचे व्यवस्थापक श्री.पवार  यांना निवेदन देऊन 14 मार्च 2022 पर्यंत थेट कर्ज प्रकरणे वितरण करण्यासाठी  निवेदन दिले होते. आणि जर 14 तारीखेपर्यत कर्ज वितरण नाही झाले तर रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे(दादा) व प.महा.अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली युवक आघाडीच्या वतीने टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा युवक जिल्हाअध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिला होता..


पण कर्जाची  वितरनाची कोणतीच कार्यवाही  न केल्यामूळे आज युवक आघाडीचे जिल्हाअध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवकांनी महामंळावर हल्ला बोल केला.यावेळी  महात्मा फुले विकास मंहामंडळास टाळे ठोकण्यासाठी कार्यकर्ते जात असताना आगोदरच गेट बंद करून पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांनी कार्यकत्यांना गेटवरच अडवले.पण कार्यकत्यांनी महामंडळास ठाळे ठोकल्याशिवाय इथून हालणार नाही असा पवित्रा घेत घोषणाबाजी करत  गेटवरून चढून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व कार्यकर्ते यांच्यात जोरात हुज्जत होऊन झोंबाझोंबी झाली.शेवटी कार्यकत्यांचा आक्रमकपणा पाहुन शहर DYSP मंगेश चव्हाण  हे  स्वतः आंदोलन ठिकाणी आले व  उत्तरची आचरसंहिता  असल्याने त्याचा भंग करु नका अशी विनंती केली.या विनंतीला मान  देऊन. महामंडळाचे  अधिकारी श्री.पवार यांनी पुणे विभागीय आयुक्त मा.राठोड यांना फोन जोडून दिल्यानंतर कार्यकत्यांनी राठोड यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.राठोड यांनी कार्यकत्यांचा अवतार पाहिल्या नंतर लवकरात लवकर कर्ज वितरण करण्याचे आश्वासन  दिले.पण  एवढ्यावरच कार्यकर्ते न थांबता त्यानी लाभार्थीना दिलेल्या मंजूरी पत्राची होळी महामंडळाचे व्यवस्थापक पवार यांच्याच हस्ते करण्यासाठी भाग पाडले व जर का दोन महिन्यात लाभार्थीना कर्ज वितरण नाही केले तर कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी यांना कार्यालय बसू देणार नाही असा इशारा अविनाश शिंदे व कार्यकर्त्यांनी  राठोड यांना दिला.

यावेळी करवीर युवाध्यक्ष सुभाष कांबळे,करवीर उपाध्यक्ष संतोष कांबळे,शहर युवाध्यक्ष किरण निकाळजे,अमर कांबळे,दिलीप कांबळे,अतूल सडोलीकर,बाबासो कागलकर,अनिल कांबळे,तानाजी कांबळे,योगेश आजाटे,रमेश कांबळे,प्रज्योत सुर्यवंशी,अंकूश वराळे,नितीन कांबळे,अकाश जाधव उपस्थीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post