इचलकरंजीत आठ वर्षानंतर प्रथमच लाकूड ओढणे शर्यतीप्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत येथील डीकेटीई नारायण मळा मैदानावर घेण्यात आलेल्या बैलाच्या लाकूड ओढणे शर्यतीस शहरवासियांचा उदंड प्रतिसाद लाभला. या शर्यतीत मोठ्या गटात पप्पू पाटील यांच्या सोन्या बैलाने तर लहान गटात बलराम देशमाने यांच्या रावण बैलाने प्रथम क्रमांक पटकावला.स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले.

तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर शहरात प्रथमच लाकूड ओढणे शर्यती झाल्याने मैदान गर्दीने फुलून गेले होते.प्रकाश आवाडे क्रीडा अकादमी, ताराराणी पक्ष आणि इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरातील डीकेटीई नारायण मळा मैदानावर भव्य  बैलाच्या लाकूड ओढणे शर्यती आयोजित केल्या होत्या. बैलगाडीसह विविध शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर प्रथमच शहरात या शर्यती होत असल्याने क्रीडा शौकिनांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या शर्यतीचा शुभारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते मैदान व लाकूड पूजन करून करण्यात आले. 

यावेळी आमदार प्रकाश आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे,ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे ,इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या शर्यतीसाठी इचलकरंजी आसपासच्या भागातून दोन्ही गटात मिळून 26 बैलांचा सहभाग होता. सकाळपासूनच शर्यतशौकिन गटागटाने  शर्यतस्थळी दाखल होत होते. संपूर्ण मैदान गर्दीने फुलून गेले होते. विजेतेपदासाठी दोन्ही गटात चांगलीच चुरस दिसून येत होती. कोण नंबर पटकवणार याची उत्सुकताही लागून राहिली होती.या शर्यतीत मोठ्या गटात पप्पू पाटील यांच्या बैलाने 31.6 सेकंद अशी वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर ज्युनिअर राजा याने 31.8 आणि राहुल घाट यांच्या बैलाने 32.9 अशी वेळ नोंदवून द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.या शर्यतीत मोठा गट - पप्पू पाटील (प्रथम), ज्युनिअर राजा (द्वितीय) व राहुल घाट (तृतीय). लहान गट - बलराम देशमाने (प्रथम), श्रीकांत मिठारी (द्वितीय) व श्री. नांद्रे (तृतीय). मोठ्या गटातील पहिल्या तीन क्रमांकाना अनुक्रमे 51 हजार रुपये व निशाण, 31 हजार व 21 हजार अशी तर लहान गटातील पहिल्या तीन क्रमांकाना 31 हजार रुपये व निशाण, 21 हजार रुपये आणि 11 हजार रुपये अशी बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

यावेळी प्रकाश मोरे, अहमद मुजावर, श्रेणिक मगदूम, बाबासो पाटील, संजय केंगार,पापालाल मुजावर, उत्तम आवाडे, आदित्य आवाडे, शैलेश गोरे, महादेव कांबळे, प्रशांत कांबळे, राजू बोंद्रे, सुभाष जाधव, संजय आरेकर ,प्रकाश निकम ,संजय जगताप, नितेश पोवार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, आवाडे समर्थक उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी राहुल घाट, तानाजी भोसले, बिलाल पटवेगार, किशोर पाटील, इरफान आत्तार, बाळासो पाटील, दत्ता शेळके, विजय देसाई, सुधाकर कोळेकर आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post