राजे सेवाभावी संस्थेच्या वतीने पाणपोई उपक्रमाचा शुभारंभ



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी शहरातील राजे  बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जुनी नगरपालिका अप्पर तहसील कार्यालय येथे पाणपोई उपक्रम सुरु करण्यात आला.या उपक्रमाचा शुभारंभ अप्पर तहसीलदार शरद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांतून मोठे कौतुक होत आहे. 



इचलकरंजी शहरातील राजे  बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनेगेल्या ९ वर्षांपासूनसमाजातील गरीब - गरजूंना विविध स्वरुपात मदत , विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यासह विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात.सध्या मोठ्या प्रमाणात हवेतील तापमान वाढल्याने नागरिकांना शुद्ध थंडगार पाणी मिळावे ,याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक बुबनाळे  व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.याचाच एक भाग म्हणून या संस्थेच्या वतीने जुनी नगरपालिका अप्पर तहसील कार्यालय येथे पाणपोई उपक्रमाचा शुभारंभ अप्पर तहसीलदार शरद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच कबनूर ग्रामपंचायत येथे पाणपोई उपक्रमाचा शुभारंभ सरपंच सौ. शोभा पवार यांच्या हस्ते व उपसरपंच सुधीर पाटील, सदस्य किशोर पाटील व संजय कट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यावेळी अप्पर तहसीलदार शरद पाटील यांच्यासह मान्यवरांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत या आदर्श कार्याचे सर्वांनी अनुकरण करावे , असे आवाहन केले.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक बुबनाळे यांनी उन्हाळ्यात नागरिकांची पाण्याअभावी गैरसोय होवू नये ,त्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे , यासाठी पाणपोई उपक्रम सुरु केल्याचे सांगितले.

या सामाजिक उपक्रमास राजे बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक माजी नगरसेवक राजू बोंद्रे ,संस्थेचे उपाध्यक्ष वृषभ कांबळे, गणेश आवळे, अवधुत खोत, गोविंद कुलकर्णी, आकाश कांबळे, ज्योती कांबळे, खलील मोमीन, सदाशिव मनोळे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post