रावेत येथील झाडे झुडुपे वाढलेल्या प्लॉटमध्ये आग

 निलेश तरस यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशामक दलाला माहिती दिल्यामुळे मोठी हानी टळली.


प्रेस मीडिया लाईव्ह

पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली शेख :

पिंपरी चिंचवड हद्दीतील   रावेत प्रभाग क्रमांक 24 या ठिकाणी एका मोकळ्या प्लॉटमध्ये सायंकाळी सातच्या सुमारास चंद्रभागा कॉर्नर जवळ अचानक आग  लागल्यामुळे आजूबाजूचे रहिवाशि व दुकानदारांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  

निलेश गुलाब तरस यांनी तत्काळ पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाला दूरध्वनी करून माहिती दिली व त्यांनी ही  प्रतिसाद देत अग्निशामक दल क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी हजर झाले. 

अग्निशामक दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर आग विझवण्याची कवायत केली. अग्निशामक दलाच्या जवानांना सहकार्य करण्यासाठी  युवा तरुण निलेश गुलाब तरस व त्यांचे मित्रमंडळी जीवाचे राण केले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार मोकळ्या प्लॉटमध्ये वाळलेली झाडे व गवत वाढले होते त्यामुळे आगीचे डोंब उसळत होते. आग लागलेल्या प्लॉटला पत्र्याचे कंपाऊंड होते त्यामुळे आग विझवण्यासाठी कवायत करावी लागली अशी माहिती प्रेस मीडिया लाईव्ह च्या प्रतिनिधीला मिळाली आहे , पण तासभरात आगीवर नियंत्रण करण्यात आले,त्यानंतर आजूबाजूच्या दुकानदारांनी व रहिवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.निलेश तरस यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशामक दलाला माहिती दिल्यामुळे मोठी हानी टळली.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post