महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या मोदीं विरोधात मिरजेत काँग्रेसची तीव्र निदर्शने

 मोदींनी माफी मागावी ; तेच खरे कोरोना स्प्रेडर.

प्रेस मीडिया ऑनलाइन :

 मिरज प्रतिनिधी  :  धनंजय हलकर (शिंदे)

मिरज : दि. ०९ :०२:२०२२ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  लोकसभेत केलेल्या भाषणात महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे. याबद्दल त्यांनी माफी मागावी यासाठी बुधवारी काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मिरज शहर कॉंग्रेस अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांच्या उपस्थितीत गांधी पुतळा, मिशन हॉस्पिटल चौक, मिरज येथे निदर्शने करण्यात आली. 


यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. 'मजुरांना मदत करणे हा जर गुन्हा असेल, तर हो, काँग्रेसने तो गुन्हा केलाय', 'महाराष्ट्र द्रोही भाजप, महाराष्ट्र द्रोही मोदी', 'नमस्ते ट्रम्प, करणारे मोदीच खरे कोरोना स्प्रेडर',  'शर्म करो मोदीजी' अशा घोषणा त्यांनी दिल्या.

राज्यातील भाजप नेत्यांना महाराष्ट्राप्रती थोडीफार आस्था असेल तर त्यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध करावा अन्यथा महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची ‘महाराष्ट्र द्रोही’ म्हणून नोंद केली जाईल अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

 महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सत्तेतून दूर केल्यापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्र द्वेषाची कावीळ झाली आहे. त्यामुळे ते दररोज महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी खोटी नाटी षडयंत्रे रचत आहेत. आता तर पंतप्रधानांनी महाराष्ट्र द्वेषाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. पंतप्रधान संपूर्ण देशाचा असतो, याचाही त्यांना विसर पडला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची गरिमा घालवली असून ते फक्त भाजपचे प्रचारक झाले आहेत.   

संकटात, अडचणीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची मदत करण्याचा मानवधर्म आणि महाराष्ट्र धर्म काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडी सरकारने निभावला. उपासमारीची वेळ आलेल्या परप्रांतीय बांधवांच्या जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांचे तिकीट काढून त्यांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित व सन्मानाने पोहोचवले. जेव्हा हे मजूर अडचणीत होते तेव्हा त्यांना मदत करण्याऐवजी पंतप्रधान लोकांना टाळ्या थाळ्या वाजवायला सांगत होते आणि आपल्या निवासस्थानी मोरांना दाणे खाऊ घालण्यात व्यस्त होते. त्यांना सर्वसामान्य जनतेपेक्षा आपल्या उद्योगपती मित्रांची जास्त काळजी आहे. संपूर्ण कोरोना काळात जनतेला मरायला सोडून मोदी आपल्या उद्योगपती मित्रांना देशाची संपत्ती वाटत होते. कोरोनाच्या संकटाच्या सुरुवातीला 'नमस्ते ट्रम्प' सारखे कार्यक्रम करून देशात कोरोनाचा प्रसार करणारे नरेंद्र मोदीच कोरोनाचे खरे स्प्रेडर आहेत. मोदीजी ज्यांच्यावर आरोप करत आहेत ते परप्रांतीय मजूर बांधव तर कोरोना वॉरियर आहेत.

यावेळी सभापती अनिल आमटवणे, बाळ बरगाले, महादेव नलवडे, विद्या नलवडे, करण जमादार, मीनाक्षी शिरसाट, बाळ बरगाले, धनराज सातपुते, योगेश जाधव, अशोकसिंह रजपूत, अकबर मोमीन, अजित दोरकर, अय्युब निशाणदार, राकेश कोळेकर, अरुण गवळी, डॉ. प्रताप भोसले, धनराज मेंढे, सनी धोतरे, वसीम रोहीले, प्रशांत चव्हाण, आशिष चौधरी, श्रीनाथ देवकर, विनायक मेंढे, अल्ताफ पटेल, एजाज शेख, प्रकाश पवार, अनिल शिरसाट, धनंजय नेहरकर, अफजल बुजरूक, राजू मडले, संजय मडले, शिवराज पवार, आशुतोश जाधव, सचिन शेळके, सलीम इनामदार, राजू कुंभार आदि मान्यवर, नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post