कोल्हापूरचे प्रसिद्ध राजाभाऊ भेळचे मालक रवींद्र शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला..

जमावाने तिघा हल्लेखोरांना चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

प्रेस मीडिया ऑनलाइन :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : शाहू खासबाग मैदान परिसरातील प्रसिद्ध राजाभाऊ भेळचे मालक रवींद्र शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला. हा प्रकार पाहणाऱ्या जमावाने तिघा हल्लेखोरांना चोप देत पोलिसांच्या हवाली केले. सोमवारी रात्री झालेल्या किरकोळ वादानंतर आज पुन्हा हा प्रकार घडला.


सोमवारी रात्री काही तरुण राजाभाऊ भेळ येथे भेळ घेण्यासाठी आले होते. त्यातील एकाने पान खाल्ले होते. पान खालेला तरुण दुकाना समोरच थुंकला . या वेळी रवींद्र शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी  त्याला हटवण्याचा प्रयत्न केला. या तून चिडून त्या तरुणाने शिंदे यांच्या सोबत वाद घातला होता. मंगळवारी दुपारी संबंधित तरुण तीन साथीदारांसह राजाभाऊ भेळ समोर आला. सोमवारी रात्री झालेल्या प्रकाराचा जाब विचारत तो पुन्हा रविंद्र शिंदे यांच्या अंगावर धावून गेला. तसेच सोबत आणलेले धारदार हत्यार त्यांच्यावर उगारले. हा प्रकार पाहणारे राजाभाऊ भेळ मधील काही कर्मचारी, आसपास जमलेले नागरिक धावत त्या ठिकाणी आले. त्यांनी तरुणांच्या हातातील हत्यार हिसकावून तिघांना चोप दिला. तर एक जण पसार झाला.या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

हल्लेखोर पाचगाव परिसरातील असल्याचे समजते. चार- पाच दिवसांपूर्वी याच तरुणांनी खाऊ गल्ली येथील राजाभाऊ दुकानावर दगडफेक केल्याचीही माहिती समोर येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post