प्रेस मीडिया ऑनलाइन :
इचलकरंजी : राज्य शासनाच्या निर्देशानुसार इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने माजी वसुंधरा अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मा.जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या प्लॅस्टिक बंदी बाबतचे आदेशानुसार प्रशासक तथा मुख्य अधिकारी शहरात प्लॅस्टिकबंदी विरोधात मोहीम तीव्र केली.
आज दि.१/२/२०२२ रोजी प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांचे आदेशानुसार उपमुख्याधिकारी केतन गुजर आणि आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्या नेतृत्वाखाली ४ विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण शहरात प्लास्टिक बंदी विरोधात धडक मोहीम राबविणेत आली. आजच्या या मोहिमेमध्ये दुकानदार, व्यावसायिक व फेरीवाले यांच्या कडून एकूण ५० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि एकूण ३८३५० रू. ची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
त्याचबरोबर यापुढेसुद्धा प्लास्टिकविरोधात अशी मोहीम सुरू राहणार असल्याने सर्व छोटे व्यापारी,दुकानदार यांनी प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले आहे.
आजच्या या मोहिमेत सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व स्वच्छता निरिक्षक यांचेसह आरोग्य आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.