कोल्हापुर : राजवर्धन गवळी खून प्रकरणी एकाला जन्मठेप



प्रेस मीडिया ऑनलाइन :

कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर : शनिवार पेठेतल्या राजवर्धन गवळी याच्या खून प्रकरणी आरोपी शिवराज पोवार याला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस आर पाटील यांनी आज जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलीय. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं ऍड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिलं.जुन्या भांडणाचा राग मनात धरून 2 जानेवारी 2016 रोजी रात्री शनिवार पेठ इथं राहणाऱ्या राजवर्धन गवळी याच्यावर उचगांव पुलाच्या परिसरात शिवाजी पोवार यानं चाकू हल्ला केला होता.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजवर्धन गवळी याला राजारामपुरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारा दरम्यान राजवर्धन गवळी याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयत राजवर्धन गवळी याचा भाऊ हर्षवर्धन गवळी याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित शिवराज पोवार यांच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू होती. आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस आर पाटील यांनी राजवर्धन गवळी याच्या खून प्रकरणी शिवराज पोवार याला जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलीय. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतींनं सरकारी वकील ऍड. विवेक शुक्ल यांनी काम पाहिलं

Post a Comment

Previous Post Next Post