धूम बाईक वाल्यांना मुंबई जुना हायवे रोड स्पीड लिमिट राहील का असा प्रश्न पडला आहे.

 त्यांच्या कर्कश्श आवाजाचा नागरिकांना होत आहे भयानक त्रास..

प्रेस मीडिया ऑनलाइन

खालापूर प्रतिनिधी :  दिनेश महाडिक


मुंबई जुना हायवे रोड सद्यस्थितीत वाहतूक वाढ झाल्याचे दिसून येत आहे मुंबईहून पुण्याकडे जाणारा जुना हायवे रोड समजला जातो परंतु त्याची नागमोडी वळणे साईट पट्ट्या अरुंद असल्यामुळे तसेच जागोजागी स्टॉप तर या रस्त्याला वाहने चालवायचे म्हणजे नियमाच्या बाहेर फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर कंटनेर ट्रक टेम्पो वाहने येत असतात रस्त्यावर सातत्याने दिवसरात्र चोवीस तास वाहने चालूच असतात परंतु काही गाड्याना स्पीड लिमिट ट्राफिक यांच्या माध्यमातून आरटीओच्या नियमानुसार त्या गाड्या चालत नसून जो तो आपल्या हातात स्टेरिंग मिळाली त्याचा गैरफायदा घेत गाडी फुल स्पीडला चालवत असतो .

महाराष्ट्र शासनाने काही ठिकाणी सी सी कॅमेरा लावणे गरजेचे आहे .  त्या अनुषंगाने कोणाचे स्पीड किती असेल कोण किती ओरटेक  करतो , कोण  किती गाडी वेगाने चालवतो याचे भानच राहत नाही , तसेच काही रोडला स्पीड ब्रेकर नसल्यामुळे स्पोर्ट बाईक वाले एवढे गाडी फास्ट मध्ये असतात वाकडे तिकडे ओव्हरटेक करणार सामान्य माणसाला टू व्हीलर वाल्याला हुलकावणी देत जात असतात

विशेष म्हणजे.....

स्पोर्ट बाईक वाले लाखो रुपये किमतीच्या गाड्या घेऊन वीस पंचवीस एकत्र ग्रुप मुंबई वरून लोणावला पुणे आशा पिकनिक स्पोटला फिरत असतात याच्यातून त्यांचा गाडी चालविणे जीव घेणे असते ते स्वतःच्या मर्जीप्रमाणे दुसऱ्याचा कुठलाही विचार करतच नाहीत दुसरा एखादा कोण मेला त्याची पर्वा नसते.अशा पद्धतीने सध्या मुंबई जुने पुणे हायवे रोड वरती प्रकार चालू आहे अशाच आज चौक रेल्वे स्टेशन च्या जवळ भरमसाठ वेगाने स्पोर्ट बाईक वाला एका ईनोवा गाडी ला आदळला त्याच्यातून तो सावरला सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही .

या बाबत पोलीस अधीक्षक रायगड यांनी याची दखल घेऊन रायगड हद्दीमधील तसेच मुंबई पुणे जुना रोड हवे शनिवार रविवार हा दिवस पिकनिक स्पोट लोणावळ्याकडे  जास्त करून स्पोर्ट बाईक वाल्यांचा प्रवास होत असतो सदर ट्राफिक यंत्रणेला सूचना देऊन बाईकस्वार वरती कडक  कारवाई करण्यात यावी तसेच धूम आवाज जो बाईक ला दिला जातो त्याचा परिणाम येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना दचकला सारखा आवाज होत असतो बाईकस्वार घाबरून आपली गाडी कुठेतरी रोड सोडून अक्सिडेंट होत असतात अशा जुना मुंबई हवे रोड वरती सध्या प्रकार चालू आहे आमची एवढीच विनंती पोलीस अधीक्षक रायगड यांनी याच्याकडे लक्ष देऊन धूम बाईक वाल्यांच्या वरती बंदी यावी अशी मागणी वाहन धारक करीत आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post