कर्जत चांधई येथे शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी

 शौर्य वीर मयूर शेळके यांना मिळाला शिवपुरस्कार 

प्रेस मीडिया लाईव्ह.कॉम :

नरेश कोळंबे  : 

   कर्जत  तालुक्यातील लहान चांधई येथे ग्रामस्थ आणि हुतात्मा हिराजी पाटील तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली . यावेळी गुणवंत विद्यार्थी, प्रा . धनंजय थोरवे , प्रा . आनंद कराळे, नेहा राजेंद्र आढाव, श्रावणी जाधव , सोनाली कोंडिलकर यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  कोरोना काळात रुग्णांना मदत करणारे, धाडसी पत्रकार बालाजी गुरव यांचा विशेष सन्मान करण्यात  आला तर वांगणी स्टेशन येथे एका अंधमातेच्या मुलाला ट्रेन खाली येत असताना कर्तव्यावर असलेले शौर्यवीर मयूर शेळके यांनी मोठ्या धाडसाने वाचवले, त्यांना शिवपुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . 

      इतिहास संशोधक शिवश्री वसंत कोळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान चांधई येथे गेल्या १६ वर्षा पासून शिवजयंती साजरी कार्यांत येते . यावेळी फुले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते प्रा . विजय कोंडिलकर सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवराय आज असते तर आजच्या समाजव्यवस्थेत त्यांनी कशा पद्धतीने राज्यकारभार केला असता व जनतेला न्याय दिला असता अन आपलं स्वराज्य कास चालवलं असत?  ते सांगितलं . 

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश कोळंबे (डायरेक्टर एस . कांत फार्मा,  वापी) यांनी, तर सूत्रसंचालन नंदकुमार कोळंबे यांनी केले. यावेळी जि. सदस्या सहाराताई कोळंबे , मा. अर्थ व बांधकाम सभापती उत्तम कोळंबे , नसरापूर ग्रामपंचायत सरपंच साक्षी मोहिते , पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते जयेंद्र कराळे, बिरसा क्रांती दल अध्यक्ष विनायक पारधी,  नसरापूर ग्रामपंचायत माजी सरपंच राम कोळंबे, चांधई गावचे पोलीस पाटील सचिन कोळंबे , सामाजिक कार्यकर्ते संतोष ऐनकर, पत्रकार नरेश कोळंबे , पळस्पे ग्रामपंचायत मा. सरपंच मोहन गवंडी , ओबीसी महासंघाचे अध्यक्ष भगवान धुळे तर सामाजिक कार्यकर्ते भाई आकाश निर्मळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कोळंबे , शिवाजी कोळंबे , संतोष कोळंबे , देविदास कोळंबे यांनी विशेष मेहनत घेतली तर  सचिन हि. कोळंबे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले .

Post a Comment

Previous Post Next Post