हटकर कोष्टी समाजाच्या महाआरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद



प्रेस मीडिया ऑनलाइन :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरात हटकर कोष्टी समाज युवक मंडळाने आयोजित केलेल्या मोफत महाआरोग्य तपासणी व होमिओपॅथीक औषधोपचार शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात १४० पेक्षा अधिक नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मोफत आवश्यक औषधांचे वितरण करण्यात आले.


इचलकरंजी शहरातील हटकर कोष्टी समाज युवक मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. याशिवाय समाजाचे विविध मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. नुकताच

सामाजिक बांधिलकी जपत मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी समाजाचे अध्यक्ष शिवकांत मेत्री यांच्या हस्ते या शिबीराचे

उद्घाटन करण्यात आले. यावेळी गणेश कोल्हापूरे, युवक अध्यक्ष अमित खानाज, अमित कबाडे, हेमंत वरुटे, श्रीनिवास उरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील बावणे गल्लीतील श्री होमिओपॅथीक दवाखाना येथे डॉ. विद्याधर खानाज, डॉ. अशोक गंगापुरे, डॉ. प्रणव निमणकर, डॉ. योगेश कोकरे आदी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे शिबिर पार पडले. यावेळी रक्तातील साखर मोफत तपासणी करण्यात आली. यासाठी डॉ. किरण नेजे यांचे सहकार्य लाभले.

या शिबिरात शिबिरात १४० पेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करून त्यांना आवश्यक औषधे देण्यात आली.यावेळी समाजाच्या नुकत्याच झालेल्या २८ व्या वधू-वर परिचय मेळाव्याच्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. शिबिर यशस्वी होण्यासाठी विजय गदाळे, श्रीशैल जेऊर, दीपक वस्त्रे, ऋषिकेश हळदे, किसन अक्केतंगेरहाळ, अमोल नेजे, प्रसन्न बेडगकर, प्रशांत गलगले, विवेक हासबे, चैतन्य नेजे, आनंद हेब्बाळ, सागर एकांडे, अमरनाथ सिंदगी,  यांच्यासह वर्किंग कमिटी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post