डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालय येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 शिरोळ  डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालय येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी शासकीय अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यास राज्यात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे 

    शिरोळ तहसील कार्यालयात पुरवठा विभागात भ्रष्ट्राचार वाढला असून भ्रष्ट्र अधिकारी यांची उचलबांगडी करावी  नाव वाढविणे नाव कमी करणे विभक्त करणे दुबार कार्ड करणे धान्य चालू करणें  बारा अंकी नंबर घालणें  या सर्व कामासाठी पाचशे  रुपये ते दोन हजार रुपये घेवुन रेशनकार्ड ताबडतोब दिले जाते आणि न दिल्यास हेलपाटे मारावे लागत आहे  त्यामूळे नागरिकांना उपासमार होत आहे तसेच माहिती अधिकारी मागितल्यास थातूर मातूर माहिती दिली जाते 

कार्ड धारकांना वाढीव पन्नास किलो गहू तांदूळ द्यावे ही मागणीही करण्यात आली आहे आंदोलनाचे नेतृत्व डीपिईचे नेते सतीश भंडारे महावीर वारे सुभाष साठे प्रियांका कांबळे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी केले आंदोलन त्वरित न मिठविल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तसेंच शिवणाकवाडी येथील ग्रामसेवक  एस  माने  एन  एच मुल्ला यांनी कामाचे मूल्याकन न करता बिले अदा केली आहेत त्यांची चोकशी करावी या मागणीसाठीही आंदोलन सुरू करण्यात आले आहे

Post a Comment

Previous Post Next Post